पोपटाच्या साक्षीवर बलात्काराच्या आरोपीला होणार शिक्षा; वारंवार उच्चारतोय मालकीणबाईचे अखेरचे शब्द 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 04:00 PM2021-09-16T16:00:40+5:302021-09-16T16:01:25+5:30

बलात्कार व खून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी   पोलीस पोपटाला साक्षीदार म्हणून उभे करणार आहेत. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटतंय ना?

PARROT'S EVIDENCE Parrot is main prosecution witness in a rape and murder trial  | पोपटाच्या साक्षीवर बलात्काराच्या आरोपीला होणार शिक्षा; वारंवार उच्चारतोय मालकीणबाईचे अखेरचे शब्द 

पोपटाच्या साक्षीवर बलात्काराच्या आरोपीला होणार शिक्षा; वारंवार उच्चारतोय मालकीणबाईचे अखेरचे शब्द 

Next

बलात्कार व खून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी   पोलीस पोपटाला साक्षीदार म्हणून उभे करणार आहेत. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटतंय ना?, पण हे खरं आहे. अर्जेंटिनाच्या एका न्यायालयात पोपटाच्या साक्षीनं बलात्काराच्या आरोपिंना कठोर शिक्षा होणार आहे. अर्जेंटिनातील ४६ वर्षीय एलिझाबेथ टोलेडो हिची राहत्या घरी हत्त्या झाली आणि दोन आरोपिंवर संशय आहे.  या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर हत्त्या केली.

भाड्यानं राहत असलेल्या घरी तिचा मृतदेह सापडला. जिथे तिच्यासोबत अन्य दोन व्यक्तिही राहत होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तिच्यासोबत राहणाऱ्या दोन व्यक्तिंची चौकशी केली आणि त्यांना याचा सुगावा पोपटाकडून लागला.  अर्जेंटिनातील सॅन इसिद्रो येथील स्थानिक न्यायालयात या पोपटाला स्थानिक भाषेत “No, por favour, soltame” म्हणजे, कृपया मला जाऊ द्या, असे म्हणताना ऐकले. तो वारंवार एलिझाबेथचे अखेरचे शब्द उच्चारत होता. त्यावरून घटनेच्या वेळी पोपट तिथे उपस्थित असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला. हा पोपट त्या महिलेचा पाळीव पोपट होता. 

पाकिस्तानातून ट्रेनिंग घेऊन आले होते दहशतवादी; १९९३ सारखा करायचा होता ब्लास्ट!

२०१८ डिसेंबरमध्ये एलिझाबेथवर हा हल्ला झाला होता. शेजाऱ्यांनीही तिचा आवाज ऐकला होता. मला का मारताय?, असे एलिझाबेथ बोलत होती, असे उच्चार ऐकल्याचा दावा पोलिसांनी केला. पोपटाव्यतिरिक्त पोलिसांनी त्या शेजाऱ्याचं स्टेटमेंटही साक्ष म्हणून नोंदवलं आहे. DNA रिपोर्ट व दातांच्या निशाणांवरून आरोपीविरोधात ठोस पुरावे मिळतील. ५३ वर्षीय मिग्युएल रोलोन व ६५ वर्षीय जॉर्ज अल्व्हारेज यांच्याविरोधात हा खटला सुरू आहे आणि ते दोषी आढळल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. 

Web Title: PARROT'S EVIDENCE Parrot is main prosecution witness in a rape and murder trial 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app