दारूसाठी पैसे नाही दिले म्हणून आई वडिलांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 21:06 IST2018-11-02T21:02:22+5:302018-11-02T21:06:12+5:30

संतप्त मुलाने रागाच्या भरात घरासमोरील मोटारसायकल त्याने पेटवून दिली. वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलगा अशोक बाळू भोजणे याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Parents had beaten by parents due to not given money for liquor | दारूसाठी पैसे नाही दिले म्हणून आई वडिलांना मारहाण

दारूसाठी पैसे नाही दिले म्हणून आई वडिलांना मारहाण

मंचर : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने आई-वडीलांना शिवीगाळ करुन हाताने तसेच लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना जारकरवाडी येथील विरोबामळा येथे घडली. संतप्त मुलाने रागाच्या भरात घरासमोरील मोटारसायकल त्याने पेटवून दिली. वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलगा अशोक बाळू भोजणे याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

                  जारकरवाडी येथील शेती व बिगारी काम करणारे बाळू पांडूरंग भोजणे यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी सायं. ७.३० वा. जारकरवाडी गावच्या हद्दीत विरोबामळा येथे राहते घरी त्यांचा मुलगा अशोक बाळू भोजणे (वय २८) दारु पिवून आला आणखी दारु पिण्यास पैसे तो मागू लागला. पैसे दिले नाही म्हणून अशोक याने वडील बाळू भोजणे व आई ताराबाई हिस शिवीगाळ करुन हाताने, लाथाबुक्याने मारहाण केली. आई-वडील निघुन जावू लागले तेव्हा घरासमोर असलेली नविन मोटारसायकल त्याने पटवून दिली.

                  मुलगा अशोक याने राहते घराचे दरवाजावर रॉकेल टाकून पेटवून देवून ८५ हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार बाळू पांडूरंग भोजणे यांनी दिली आहे.  पोलीसांत तक्रार केली तर मी जेलमधून आल्यावर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी मुलगा अशोक याने आईवडीलांना दिली. वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अशोक बाळू भोजणे याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करीत आहे.

Web Title: Parents had beaten by parents due to not given money for liquor