Psycho Killer Poonam : "माझ्या मुलीसारखं पूनमलाही तडफडून-तडफडून मारा"; जियाच्या आईचा सायको किलरबद्दल मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 11:13 IST2025-12-08T11:10:55+5:302025-12-08T11:13:33+5:30

Psycho Killer Poonam : चार निष्पाप मुलांची हत्या करणारी सायको किलर पूनमच्या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. जियाची आई प्रियाने धक्कादायक माहिती उघड केली आहे.

panipat psycho killer Poonam ground report | Psycho Killer Poonam : "माझ्या मुलीसारखं पूनमलाही तडफडून-तडफडून मारा"; जियाच्या आईचा सायको किलरबद्दल मोठा खुलासा

फोटो - आजतक

हरियाणातील पानिपतमध्ये चार निष्पाप मुलांची हत्या करणारी सायको किलर पूनमच्या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. जियाची आई प्रियाने धक्कादायक माहिती उघड केली आहे. तिने सांगितलं की, ज्या रात्री जियाची हत्या झाली तेव्हा ती खूप आनंदी होती. तिने तिच्या वडिलांकडे नवीन कपाटासाठी हट्ट धरला होता.

जियाची आई म्हणाली, "रात्री १२:३० वाजेपर्यंत जिया तिची पुस्तकं, कपडे आणि खेळणी कपाटात ठेवत होती." तिने असंही स्पष्ट केलं की हत्येच्या रात्री जियाने पूनमसोबत झोपण्याचा हट्ट केला नाही, तरी पूनम तिला जबरदस्तीने तिच्यासोबत झोपायला घेऊन गेली. प्रियाने स्पष्ट केलं की तिची निष्पाप मुलगी जिया पूनमला घट्ट मिठ्ठी मारून झोपली होती.

"जसं मुलांना तडफडून मारलं, तशीच भयंकर शिक्षा द्या"; सायको किलर पूनमच्या पतीचं मोठं विधान

जियाची आई प्रियाने अशी मागणी केली आहे की, सायको किलर पूनमने जसं मुलीला त़डफडून तडफडून मारलं तसंच तिलाही मारलं पाहिजे. पूनमला देखील तडफडून तडफडून मारा. जियाच्या आईने दावा केला की तिला नेहमीच पूनमवर संशय होता, परंतु नशिबात असेल ते कोण टाळू शकत नाही असं म्हणत तिला समाजाने गप्पा केलं.

काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी

"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?

जियाची ताई, पारुलनेही सायको किलर पूनमला पहाटे ३ वाजता हातात काहीतरी घेऊन पायऱ्या उतरताना आणि नंतर परत जाताना पाहिलं होतं. त्यावेळी अंधार होता, त्यामुळे ते स्पष्टपणे दिसत नव्हतं. पारुलने दावा केला की पूनम तिचा मुलगा सनीलाही लक्ष्य करू इच्छित होती. पूनमने सनीला मॉलमध्ये घेऊन जाईन असं सांगितलं होतं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title : पूनम को मेरी बेटी की तरह मारो: माँ की मांग

Web Summary : मानसिक हत्यारी पूनम द्वारा मारी गई जिया की माँ ने वैसी ही सजा की मांग की। जिया उस रात खुश थी जब उसकी मृत्यु हुई, एक नई अलमारी के बारे में उत्साहित थी। बड़ी बहन ने पूनम को संदिग्ध तरीके से काम करते देखा। पुलिस मामले की आगे जांच कर रही है।

Web Title : Punish Poonam Like She Killed My Daughter: Mother's Demand

Web Summary : The mother of Jia, killed by psycho killer Poonam, demands similar punishment. Jia was happy the night she died, excited about a new cupboard. The older sister saw Poonam acting suspiciously. Police are investigating the case further.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.