भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:13 IST2025-12-04T12:13:13+5:302025-12-04T12:13:59+5:30
एका महिला सायको किलरचा पर्दाफाश झाला आहे, जिने चार निष्पाप मुलांची हत्या केली.

भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
हरियाणाच्या पानिपतमध्ये एका महिला सायको किलरचा पर्दाफाश झाला आहे, जिने चार निष्पाप मुलांची हत्या केली. पूनम असं आरोपी महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनमने सर्वात आधी विधी नावाच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने विधीच्या चेहऱ्यावर उकळता चहा ओतला. यामध्ये मुलगी गंभीर भाजली होती, पण ती वाचली. त्यावेळी विधीच्या वडिलांनी तो अपघात असल्याचं सांगत प्रकरण दाबलं.
पूनम तिथेच थांबली नाहीत. तिला एक विचित्र वेड होतं की, कोणतीही मुलगी मोठी होऊन तिच्यापेक्षा सुंदर होऊ नये. या वेडामुळे ती एक सायको किलर बनली. पोलीस चौकशीदरम्यान तिने सुंदर मुलींचा द्वेष केल्याचं कबूल केलं. तिने तिच्या नातेवाईकांच्या आणि कुटुंबातील मुलींना टार्गेट केलं. २०२३ मध्ये तिने इशिका आणि शुभम या दोन जणांची हत्या केली. शुभम हा तिचा स्वतःचा मुलगा होता. पूनमने आधी दोन्ही मुलींची हत्या केली. नंतर, संशय टाळण्यासाठी तिने तिच्या मुलालाही मारलं.
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
"मी पकडली जाऊ नये म्हणून माझ्या मुलाला मारलं" असं पूनमने चौकशीदरम्यान म्हटलं आहे. २०२५ मध्ये तिने पुन्हा हल्ला केला. तिने दुसऱ्यांदा विधीला टार्गेट केले. यावेळी तिने पाण्याच्या टबमध्ये बुडवून तिला मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना संशय आला की, सहा वर्षांच्या मुलीने टबमध्ये स्वतःला बुडवलं नसेल. तपासात असं दिसून आलं की खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता, म्हणजेच ही हत्या होती.
पानिपतचे पोलीस अधीक्षक भूपेंद्र सिंह म्हणाले की, पूनम हुशार आणि बुद्धिमान होती, पण तिचे विचार धोकादायक होते. "कोणत्याही सुंदर मुलीला पाहून तिचं डोकं फिरायचं. चौकशीदरम्यान पूनमने स्पष्ट केलं की तिला भीती वाटते की, दुसरी कोणतीही मुलगी मोठी होऊन तिच्यापेक्षा सुंदर होऊ नाही. म्हणूनच तिने चार निष्पाप मुलांची जीव घेतला. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.