तिन्ही हत्या एकादशीच्या दिवशी; पोटच्या मुलाला संपवून दुसऱ्या मुलालाही त्याचेच नाव दिले, थरारक सत्य उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 19:27 IST2025-12-04T19:26:43+5:302025-12-04T19:27:23+5:30
हरियाणात चार बालकांची हत्या करणाऱ्या पूनमबाबत अतिशय धक्कादायक खुलासा झाला आहे.

तिन्ही हत्या एकादशीच्या दिवशी; पोटच्या मुलाला संपवून दुसऱ्या मुलालाही त्याचेच नाव दिले, थरारक सत्य उघड
Haryana Crime: हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील सिवाह गावात चार निष्पाप मुलांच्या रहस्यमय मृत्यूने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या हत्याकांडात एक अत्यंत धक्कादायक वळण आले असून, मुलांची हत्या त्यांचीच मावशीने पूनम नावाच्या महिलेने केल्याचे उघड झाले आहे. 'माझ्यापेक्षा मोठी झाल्यावर कोणतीही मुलगी सुंदर दिसू नये' या खुन्नसमध्ये तिने तीन लहान मुलींना आणि स्वतःच्या मुलालाही क्रूरपणे ठार मारले. धक्कादायक बाब म्हणजे या हत्या एकादशीच्या दिवशी करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केल्यामुळे यामागे काही तांत्रिक क्रिया असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
४५ वर्षीय पूनमने सौंदर्याच्या वेडातून हे क्रूर कृत्य केले. तिला भीती वाटत होती की, ही मुले मोठी झाल्यावर तिच्यापेक्षा अधिक सुंदर दिसतील. पूनमने एकूण चार मुलांची हत्या केली. तिने ९ वर्षाच्या इशिकाची २०२३ मध्ये हत्या केली. त्याच वर्षी पूनमने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून ४ वर्षांच्या शुमभ या तिच्याच मुलाला मारलं. त्यानंतर तिने दोन वर्षांनी ८ वर्षाच्या जियाची आणि विधीची हत्या केली.
पूनमने या क्रूरतेला २०२१ मध्ये सुरुवात केली. तिची पहिली शिकार विधि होती, जिच्या चेहऱ्यावर पूनमने उकळता चहा ओतला होता. विधि त्यावेळी गंभीर भाजली, पण वाचली. कुटुंबियांनी याला अपघात समजून दुर्लक्ष केले होते. २०२५ मध्ये विधिला दुसऱ्यांदा मारण्याचा प्रयत्न झाला. यावेळी तिला पाण्याच्या टबमध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला. याच घटनेने पोलिसांना संशय आला, कारण ६ वर्षांची मुलगी स्वतःहून टबमध्ये बुडून मरणे शक्य नव्हते.
पूनमच्या कुटुंबातील सदस्यांनी, विशेषतः जियाचे काका सुरेंद्र यांनी केलेल्या दाव्यानुसार हे हत्याकांड सामान्य नाही. कुटुंबाच्या लक्षात आले की, पूनमने तीन वेगवेगळ्या प्रसंगी ज्या हत्या केल्या, त्या तिन्ही वेळा एकादशीचा दिवस होता. सुरेंद्र यांनी सांगितले की, तिन्ही घटनांमध्ये हत्या करण्याची पद्धत सारखी होती. हा सर्व तांत्रिक क्रियेचा भाग असू शकतो.
पहिल्या हत्येनंतर पूनम सुमारे दीड वर्ष शांत राहिली, कारण ती त्यावेळी गर्भवती होती. कुटुंबियांचा अंदाज आहे की, ती गर्भवती नसती तर आणखी मुले तिच्या क्रूरतेची शिकार झाली असती. जियाच्या मृत्यूनंतर सुरेंद्र यांनी पूनमवर संशय व्यक्त केला होता. मात्र, पूनम अचानक रडू लागली आणि आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागली. बदनामीच्या भीतीने कुटुंबाने त्यावेळी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. हीच चूक त्यांच्यासाठी अधिक धोकादायक ठरली. जर सुरुवातीलाच एफआयआर दाखल झाला असता, तर पुढील हत्या टळल्या असत्या, असे सुरेंद्र म्हणाले.
म्हणून मुलाचे नाव ठेवले शुभम
पूनमने तीन मुलींव्यतिरिक्त तिने तिच्या मुलाला शुभमचीही हत्या केली होती. संशय येऊ नये म्हणून तिने तिच्या मुलालाही मारले होते. पूनमने तिच्या दुसऱ्याही मुलाचे नाव शुभम ठेवले होते. पूनमच्या कुटुंबाने सांगितले की तिच्या पहिल्या मुलाच्या हत्येनंतर तिला त्याची आठवण येत असे आणि ती तिचा त्याच्यावर जीव होता. त्यामुळे जेव्हा तिला दुसरा मुलगा झाला तेव्हा तिने त्याचे नाव शुभम ठेवले.
पूनमला फाशी देण्याची मागणी
आरोपी पूनमचा चुलत भाऊ असलेल्या सुरेंद्रने प्रशासनाकडे खुलेआम फाशी देण्याची मागणी केली आहे. सुरेंद्र यांनी मागणी केली आहे की, पूनमला कोणत्याही परिस्थितीत जन्मठेप किंवा कमी शिक्षा दिली जाऊ नये. कारण पॅरोलवर ती कधी बाहेर आल्यास, आणखी किती मुलांचा जीव घेईल, हे सांगू शकत नाही.