खळबळजनक! मुलीचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार करून खून केल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 17:43 IST2022-06-16T17:42:49+5:302022-06-16T17:43:28+5:30
Suspicious Death : दहावीची परीक्षा दिलेली अल्पवयीन मुलीचा मृतदेह वडपाडा गावापासून काही अंतरावर मिळून आला आहे.

खळबळजनक! मुलीचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार करून खून केल्याचा संशय
हुसेन मेमन, जव्हार
जव्हार तालुक्यातील वडपाडा येथील 16 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. दहावीची परीक्षा दिलेली अल्पवयीन मुलीचा मृतदेह वडपाडा गावापासून काही अंतरावर मिळून आला आहे.
मंगळवार पासून ती बेपत्ता होती, ती सापडत नाही म्हणून कुटुंबियांनी बुधवारी मिसिंगची तक्रार जव्हार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. बुधवारी सायंकाळी मात्र गावकऱ्यांना तिचा मृतदेह सापडून आला, अंगावर व डोक्यावर मार लागल्याचे प्रथम दर्शनीय दिसून आले असून, तिचा बलात्कार ही झाल्याच्या संशय व्यक्त केला जात असून, शवविच्छेदनाचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
सुरक्षारक्षकाच्या हत्येचा आठ तासात छडा; तिघांपैकी एकाला अटक
मन सुन्न करणारी घटना घडल्यामुळे पालघर जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, प्रकाश गायकवाड घटनास्थळी उपस्थित होते, जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे तपास करीत असून, अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.