नवजात पुरुषजातीचे मृत अर्भक सापडल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 21:26 IST2021-08-20T21:22:08+5:302021-08-20T21:26:28+5:30

Found of dead infan : या घटनेने परिसरात अर्भकाच्या अनोळखी पालकांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

Panic situation over found of dead infant | नवजात पुरुषजातीचे मृत अर्भक सापडल्याने खळबळ

नवजात पुरुषजातीचे मृत अर्भक सापडल्याने खळबळ

ठळक मुद्देया प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून  पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास  सुरु केला आहे .

मीरारोड -  भाईंदर पश्चिमेच्या गणेशदेवल नगरमध्ये  ६ ते ७ महिन्याचे नवजात पुरुषजातीचे मृत अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. येथील शिमला गल्ली नंबर ३ या ठिकाणी एका बंद असलेल्या खोलीच्या बाहेर हे अर्भक कोणीतरी टाकून गेले होते. सदर प्रकाराची माहिती मिळताच भाईंदर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले व भीमसेन जोशी रुग्णालयात नेले असता ते आधीच मृत झाले असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून  पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास  सुरु केला आहे . या घटनेने परिसरात अर्भकाच्या अनोळखी पालकांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

Web Title: Panic situation over found of dead infant