कुर्ल्यात खळबळ! विवाहितेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी केली ४ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:46 IST2022-06-15T17:44:52+5:302022-06-15T17:46:14+5:30
Gangrape Case : याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे.

कुर्ल्यात खळबळ! विवाहितेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी केली ४ जणांना अटक
मुंबई - नोकरीच्या शोधात मुंबईत आलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेवर मंगळवारी मुंबईतील कुर्ला परिसरात सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे.
मुंबई पोलीस अधिकाऱ्याने या घटनेबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, "नोकरीच्या शोधात मुंबईत आलेल्या एका १९ वर्षीय विवाहित महिलेवर मुंबईतील कुर्ला परिसरात सामूहिक बलात्कार करण्यात आला. नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे." पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कोलकाता येथील रहिवासी असून मार्च महिन्यात नोकरीच्या शोधात तिच्या नातेवाईकासह मुंबईत आली होती.
लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने संपवलं आयुष्य, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी
महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या नातेवाईकासह तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी नेहरूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.