चेंबुरमध्ये खळबळ! दुकलीकड़ून गोळीबार, एक जण जखमी तर आरोपीचा शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 20:08 IST2021-12-20T20:08:29+5:302021-12-20T20:08:57+5:30
Firing Case : चेंबूर वाशी नाका आएनए उद्यानाजवळ सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे.

चेंबुरमध्ये खळबळ! दुकलीकड़ून गोळीबार, एक जण जखमी तर आरोपीचा शोध सुरु
मुंबई : चेंबूरमध्ये एका दुकलीकड़ून रविंद्र गायकवाड़ याच्यावर गोळीबार करण्यात करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे.
चेंबूर वाशी नाका आएनए उद्यानाजवळ सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गायकवाड़ हा देखील अभिलेखावरील आरोपी असून, यात जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
खळबळजनक! धारदार शस्त्राने वार करून रेल्वे स्टेशनजवळ तरुणाची हत्या
आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाळासाहेब घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड़ हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. तसेच हल्लेखोरापैकी एकाची ओळख पटली असून त्यानुसार शोध सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आला असून अडिज तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले..