क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 14:12 IST2025-12-27T14:11:29+5:302025-12-27T14:12:40+5:30
एका तरुणाने सासरी जाऊन आपली पत्नी, सासू आणि सासऱ्यांवर तलवारीने हल्ला केल्याची भयंकर घटना घडली आहे.

फोटो - आजतक
राजस्थानमधील पाली येथे एका तरुणाने सासरी जाऊन आपली पत्नी, सासू आणि सासऱ्यांवर तलवारीने हल्ला केल्याची भयंकर घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हातात रक्ताने माखलेली तलवार घेऊन लोकांना घाबरवताना दिसत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
पाली शहरातील एका कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. ५५ वर्षीय जगदीश जोशी यांनी सुमारे ८ वर्षांपूर्वी आपली मुलगी आशा हिचं लग्न मेड़ता सिटी येथील रहिवासी अजय जोशी याच्याशी लावलं होतं. अजय जोधपूरमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. लग्नाच्या काही वर्षांनंतर पती-पत्नीमध्ये मतभेद सुरू झाले. गेल्या चार महिन्यांपासून दोघांमध्ये प्रचंड तणाव होता, त्यामुळे आशा आपल्या तीन मुलांसह माहेरी येऊन राहत होती.
अजय आपल्या पत्नीला परत पाठवण्यासाठी सासरच्या मंडळींवर सतत दबाव टाकत होता, मात्र सासू-सासरे त्यासाठी तयार नव्हते. याच रागातून अजयने टोकाचं पाऊल उचललं. घटनेच्या दिवशी संध्याकाळी आशा आणि तिची आई दुर्गा परिसरात होत्या. त्याचवेळी अजय तिथे पोहोचला. त्याने हेल्मेट घातलं हों आणि आपल्या जॅकेटमध्ये तलवार लपवून आणली होती. आशाला पाहताच त्याने अचानक तलवार काढली आणि तो तिच्या मागे धावला. आपला जीव वाचवण्यासाठी आशा घराच्या आत पळाली.
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
जेव्हा सासू दुर्गा जोशी यांनी अजयला रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने त्यांच्या हातावर आणि पायावर तलवारीने सपासप वार केले. हे पाहून आशा आपल्या आईला वाचवण्यासाठी बाहेर आली, पण अजयने तिच्यावरही हल्ला केला. त्यानंतर जेव्हा जगदीश जोशी आपल्या पत्नीला आणि मुलीला वाचवण्यासाठी धावले, तेव्हा अजयने त्यांच्या डोक्यावर तलवारीने प्रहार केला, ज्यामुळे ते जागीच कोसळले.
कुटुंबातील सून काजल त्यावेळी घरात झोपली होती. आरडाओरडा ऐकून ती बाहेर आली तेव्हा तिला दिसलं की, अजय सासू-सासरे आणि नणंदेवर तलवारीने हल्ला करत आहे. तिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिलाही धक्का देऊन खाली पाडले. हल्ल्यानंतर आरोपी रक्ताळलेली तलवार घेऊन परिसरात फिरत होता. जो कोणी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता, त्याला तो तलवारीचा धाक दाखवून पळवून लावत होता.
हातात तलवार पाहून परिसरातील लोक घाबरले. काही वेळाने आरोपी तिथून पसार झाला. स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने बांगड रुग्णालयात दाखल केलं. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे जगदीश जोशी यांची प्रकृती चिंताजनक आहे, ते व्हेंटिलेटरवर आहेत. तर दुर्गा जोशी यांच्या हाता-पायावर तलवारीचे खोल वार झाले आहेत. जखमींना अधिक उपचारासाठी जोधपूरला रेफर करण्यात आलं आहे.