शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

Palghar Mob Lynching : दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, तपास सीआयडीकडे वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 14:45 IST

Palghar Mob Lynching : निलंबित करण्यात आल्याची घोषणा कोकण पोलीस महासंचालकनी केली.

ठळक मुद्देकासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काले आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर कटारे यांना दोषी ठरवित निलंबन डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना गेल्या गुरुवारी रात्री घडली होती. 

पालघर - डहाणू जिल्यातील गडचिंचले परिसरात दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकास गावकऱ्यांनी बेदम मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या केली. या तिहेरी हत्येप्रकरणी अपयशी ठरलेल्या कासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काले आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर कटारे यांना दोषी ठरवित निलंबित करण्यात आल्याची घोषणा कोकण पोलीस महासंचालकांनी केली. तसेच तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.

Palghar Mob Lynching: पालघर ‘मॉब लिंचिंग’चा प्रकार दुर्दैवी पण हे पहिल्यांदाच घडलं असं नाही, तर...

नराधमांची भूमी...लाज वाटली पाहिजे...!! पालघरच्या घटनेवर सुमीत राघवनची जळजळीत प्रतिक्रिया

Palghar Mob Lynching: बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात संतांची हत्या, कल्पनाही करवत नाही; ऑलिम्पिकपटू योगेश्वर दत्तची खंत

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना गेल्या गुरुवारी रात्री घडली होती. समजून सांगण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी कासा पोलिसांनी ११० जणांना अटक केली. त्यापैकी नऊजण अल्पवयीन असून त्यांना बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.  हा हल्ला गावात चोर आल्याच्या अफवेमुळे झाल्याचे समजते.

Palghar Mob Lynching: संतांची निर्घृण हत्या; भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण म्हणतो...

Palghar Mob Lynching: ठाकरे सरकार झोपा काढत आहे का?; बबिता फोगाटची टीका

हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (३०), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०, रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (३०) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील दिवशी या ग्रामपंचायतमधील गडचिंचले येथे हा प्रकार घडला. मुंबईतील कांदिवली येथून सुरतकडे कारने जाणाऱ्या तिघांना गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गडचिंचले येथे रोखून चोर समजून २५० ते ३०० च्या जमावाने रोखले. जमावाने त्यांच्यावर कोयती, कुऱ्हाडी आणि दगडांच्या साहाय्याने हल्ला केला होता.  येथील वनचौकीवर कार्यरत वनरक्षकाने याची माहिती पोलिसांना दिली. तिथे आलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. त्यात चार पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांच्या चार गाड्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, या प्रकरणावरून आता राजकीय आरोप - प्रत्यारोप सुरु झाले आहेत. 

 

टॅग्स :palgharपालघरPoliceपोलिसLynchingलीचिंगsuspensionनिलंबन