Palghar Mob Lynching: संतांची निर्घृण हत्या; भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण म्हणतो...

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर, कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्यासह अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:28 AM2020-04-20T11:28:06+5:302020-04-20T11:31:47+5:30

whatsapp join usJoin us
Palghar Mob Lynching: So hurtful to see the images of Palghar Mob Lynching terrible and barbaric act, Say Irfan pathan svg | Palghar Mob Lynching: संतांची निर्घृण हत्या; भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण म्हणतो...

Palghar Mob Lynching: संतांची निर्घृण हत्या; भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण म्हणतो...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने गुरुवारी रात्री तिघांची हत्या केल्याची घटना घडली. यावेळी समजूत घालण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी कासा पोलिसांनी ११० जणांना अटक केली. हा हल्ला गावात चोर आल्याच्या अफवेमुळे झाल्याचे समजते. या घटनेचा देशभरात तीव्र निषेध केला जात आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर, कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्यासह अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण यानंही घटनेवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. 

या हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (३०), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०, रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (३०) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील दिवशी या ग्रामपंचायतमधील गडचिंचले येथे हा प्रकार घडला. मुंबईतील कांदिवली येथून सुरतकडे कारने जाणाऱ्या तिघांना गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून २५० ते ३०० च्या जमावाने रोखले. जमावाने त्यांच्यावर कोयती, कुऱ्हाडी आणि दगडांच्या सहाय्याने हल्ला केला. येथील वनचौकीवर कार्यरत वनरक्षकाने याची माहिती पोलिसांना दिली. तिथे आलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. त्यात चार पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांच्या चार गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेवर इरफान पठाणनं ट्विट केलं की,''पालघरमधील जमावाचा क्रुरपणा आणि रानटी हल्ला पाहून मनाला फार वेदना झाल्या. लज्जास्पद कृत्य.''


 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

'त्या' सहा षटकारानंतर झाली होती बॅटची तपासणी; खुद्द युवराजनं दिली माहिती

मानवी कातडी घालून प्राणी फिरत आहेत; गौतम गंभीरकडून तीव्र शब्दात निषेध

ठाकरे सरकार झोपा काढत आहे का?; बबिता फोगाटची टीका

MS Dhoni चं लक्ष वेधण्यासाठी साक्षीला काय काय करावं लागतंय? पाहा फोटो

Web Title: Palghar Mob Lynching: So hurtful to see the images of Palghar Mob Lynching terrible and barbaric act, Say Irfan pathan svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.