शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘भूतबाधा’ पळविण्यासाठी पोटच्या मुलीलाच संपविले; नागपूरमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 06:14 IST

गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेला सिद्धार्थ व रंजना लहान मुलगी अनक्षी आणि इतर मुलींसह टाकळघाटच्या दरगाहला गेले होते.

नागपूर : मुलीच्या शरीरात झालेली कथित भूतबाधा पळविण्यासाठी जन्मदात्या आई-वडिलांनीच पाच वर्षांच्या चिमुकलीला बेदम मारहाण करून मारल्याची संतापजनक घटना प्रतापनगर परिसरातील कामगार कॉलनीत शनिवारी दुपारी घडली.

अनक्षी सिद्धार्थ चिमणे, असे मृत बालिकेचे नाव आहे, तर वडील सिद्धार्थ प्रल्हाद चिमणे (४५), आई रंजना सिद्धार्थ चिमणे (४१, दोघे रा. कामगारनगर) आणि मावशी प्रिया अमर बन्सोड (३५, भिवापूर), अशी आरोपींची नावे आहेत. वडील सिद्धार्थ एक यू-ट्यूब चॅनल चालवितात. आरोपींनी मुलीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओही तयार केला होता. यामुळे  आरोपींच्या क्रूर कृत्याच्या पुरावा मिळाला आहे. 

गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेला सिद्धार्थ व रंजना लहान मुलगी अनक्षी आणि इतर मुलींसह टाकळघाटच्या दरगाहला गेले होते. तेथून परतल्यानंतर अनक्षीने भोजन करणे बंद केले. दाम्पत्याला मुलीच्या वागणुकीत बदल झाल्याची शंका आली. त्यांनी मुलीला भूतबाधा झाल्याचा समज करून घेत तिला काळ्या जादूने बरे करण्याचे ठरविले. शुक्रवारी कथित झाडफुक केल्यानंतर आरोपींनी अनक्षीला चामड्याच्या बेल्टने बेदम मारहाण केली. त्यात ती बेशुद्ध झाली. शनिवारी तिला उमरेडच्या दरगाहमध्ये घेऊन गेले. परतल्यानंतर मुलीच्या शरीराची हालचाल बंद झाली होती. 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूरPoliceपोलिस