एक १५ दिवसांचं नवजात बाळ... तोंडात छोटा दगड कोंबलेला आणि त्यानंतर तो बाहेर पडून नये म्हणून फेविक्विक चिटकवलेलं. गुरे चारणाऱ्या एका माणसाला ते दिसलं. त्याने जवळून बघितलं, ते तेव्हा त्याचे अवस्था बघण्यारखी नव्हती. त्याने सावकाश मुलाचे चिटकवलेले ओठ वेगळे केले. तोंडातून दगड काढला. त्यानंतर मुलाने फोडलेल्या टाहो, त्याच्या काळजात चर्रर्र झालं.
राजस्थानातील भीलवाडामध्ये ही घटना समोर आली आहे. एका १५ दिवसाच्या नवजात बाळाला अतिशय क्रूरपणे जंगलात फेकून देण्यात आले. जंगलात गुरे चारायला घेऊन जाणाऱ्या एका गुरख्याला हे बाळ दिसले. त्याने त्याला उचलून जवळ घेतले. तेव्हा त्याचे तोंड चिकटवले असल्याचे त्याच्या लक्षात आले.
त्याने बाळाच्या तोंडातून दगड बाहेर काढला. त्यावेळी बाळाने रडायला सुरूवात केली. बाळाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही तिथे आले. त्यांनी तातडीने त्याला शासकीय रुग्णालयात नेले. तिथे आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
बिजोलिया पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले की, हे बाळ सीता कुंड मंदिराच्या समोर असलेल्या जंगलात मिळाले आहे. बाळाच्या तोंडात दगड कोंबलेला होता. जंगलात फेकल्यानंतर ते रडेल आणि त्यामुळे इतरांना त्यांच्याबद्दल कळेल. त्यामुळे त्यांच्या तोंडात दगड टाकलेला असावा. सध्या त्याच्यावर बिजोलिया येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याला कोणी फेकले याचा तपास करत आहोत.