शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

कामगार भरती प्रक्रिया राबविणाऱ्या संस्थेने उमेदवारांच्या उत्तर पत्रिकेत केली खाडाखोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 6:30 PM

दोघा उमेदवारांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

ठळक मुद्दे नोकरीपासून ठेवले वंचित, कामगार आयुक्तालयाने केला गुन्हा दाखल 

पुणे : कामगार आयुक्त कार्यालयाने घेतलेल्या क्लार्क, शिपाईपदाच्या भरती प्रक्रियेचे काम सोपविलेल्या संस्थेनेच उत्तर पत्रिकेत खाडाखोड करुन उमेदवारांच्या निकालात फेरफार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी परीक्षा घेण्याचे काम दिलेल्या कंपनीच्या संचालकांच्या विरुद्ध कामगार आयुक्तालयाच्या वतीने खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा उमेदवारांनी केलेल्या तक्रारीवरुन हा प्रकार उघडकीस आला आहे.प्रसाद बांदिवडेकर (संचालक, मे एक्झॉन आॅटोमेशन, दादर, मुंबई, सध्या एस बी सिस्टिम प्रा. लि. (विश्व कुटीर शंकर घाणेकर मार्ग, दादर), आनंद काळे व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ हा प्रकार २२ जानेवारी ते १० मार्च २०१७ या कालावधीत घडला होता़ याप्रकरणी सहायक कामगार आयुक्त मुजम्मील मुजावर (वय ३४, रा़ जुनी सांगवी) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार आयुक्त कार्यालयामार्फत सरळ सेवा भरती प्रक्रिया २०१५ मध्ये राबविण्यात आली होती. त्यात क्लार्क, शिपाई (वर्ग क व ड) ८ हजार९४ पदांची भरती होणार होती. या परिक्षेचे काम एक्झॉन कंपनीला देण्यात आले होते. दरम्यान घेण्यात आलेल्या पती परीक्षेतील काम संबंधित कंपनीला देण्यात आले होते. कंपनीने आर्थिक प्रलोभनाला बळी पडून नियमांना बगल देऊन त्यांनी भरती प्रक्रियेतील क्रमांक १ व २ उमेदवारांच्या उत्तर पत्रिकेत खाडाखोड केली. त्यांच्या निकालात फेरफार केला. त्यामुळे या दोन उमेदवारांना शासकीय सेवेपासून वंचित राहावे लागले. उमेदवारांचे आर्थिक नुकसान करुन उमेदवारांची व शासनाची फसवणुक केली. महेंद्र देशमुख आणि सुधाकर इंगळे यांनी याचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे कामगार आयुक्तांनी या परीक्षेची चौकशी केली. त्यात त्यांच्या उत्तर पत्रिकेत खाडाखोड केल्यामुळे त्यांना शासकीय नोकरी मिळू शकली नसल्याचे स्पष्ट झाल्याने कंपनी व संचालकांविरुद्ध तब्बल ३ वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. देवकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी