पुण्यात तरुणांच्या टोळक्यांची उघडपणे दहशत; CCTV मध्ये प्रकार कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 21:19 IST2022-01-18T21:19:00+5:302022-01-18T21:19:19+5:30
विश्रांतवाडीत राहिला नाही पोलिसांचा वचक, कळसमध्ये गुन्हेगारांची हत्यारे घेऊन दहशत, समाज माध्यमांमध्ये व्हिडिओ वायरल

पुण्यात तरुणांच्या टोळक्यांची उघडपणे दहशत; CCTV मध्ये प्रकार कैद
येरवडा - विश्रांतवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील कळस गांव येथे रविवारी रात्री दोन गटात झालेल्या वादात तरुणांच्या टोळक्याने हातात हत्यारे घेऊन परिसरात दहशत माजवली. रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी गाड्या व रिक्षा देखील फोडल्या. या घटनेमुळे कळस गाव परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हातामध्ये तीक्ष्ण हत्यारे घेऊन तरूण धावत असताना दिसत आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या दोन्ही गटातील संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे धानोरीतील मुंजाबा वस्ती मध्ये देखील आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोयते, तलवारी, दांडके घेऊन दुकाने व टपऱ्यांची तोडफोड करत आरडाओरडा करून दहशत माजवली होती. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे तसेच गुन्हेगारांचा सुळसुळाट झाला असून पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक कमी झाला आहे. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून विश्रांतवाडी हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यातील कायदा सुव्यवस्था ऐरणीवर, रस्त्यावर शस्त्र बाळगत तरुणांची दहशत #Punepic.twitter.com/0ebrSEUjLf
— Lokmat (@lokmat) January 18, 2022