केवळ ५०० रुपये घेऊन पतीने पत्नीला केले मित्राच्या हवाली, त्याने केला बलात्कार आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 15:17 IST2021-10-04T15:15:29+5:302021-10-04T15:17:29+5:30

Crime News: पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीला केवळ ५०० रुपये घेऊन मित्राच्या हवाली केले. त्यानंतर या मित्राने या महिलेला निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान

With only 500 rupees, the husband handed over his wife to a friend, he raped her | केवळ ५०० रुपये घेऊन पतीने पत्नीला केले मित्राच्या हवाली, त्याने केला बलात्कार आणि मग...

केवळ ५०० रुपये घेऊन पतीने पत्नीला केले मित्राच्या हवाली, त्याने केला बलात्कार आणि मग...

जयपूर - राजस्थानमधील शेखावटी भागातील सीकर जिल्ह्यात पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीला केवळ ५०० रुपये घेऊन मित्राच्या हवाली केले. त्यानंतर या मित्राने या महिलेला निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, ही घटना उघड होताच पोलिसांनी त्वरित कारवाई करून दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना सीकर जिल्ह्यातील रिंगस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी पीडितेला सखी सेंटरमध्ये पाठवले आहे. आता पोलीस संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. (With only 500 rupees, the husband handed over his wife to a friend, he raped her)

या प्रकरणी ठाणे प्रभारी मदनलाल कडवासरा यांनी सांगितले की, या बाबत चार दिवसांपूर्वी गुजरातमधील एका २१ वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली होती. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिने रींगस परिसरातील मऊ गावातील तरुणासोबत कथितपणे प्रेमविवाह केला होता. चार दिवसांपूर्वी रात्री सुमारे ९ च्या सुमारास पीडिता तिच्या पतीसोबत रींगस भागातील भैरुंजी येथे एका हॉटेलजवळ बसली होती. या दरम्यान तिच्या पतीचा मित्र महरोजी येथील सोनू शर्मा तिथे आला. तिथे तिच्या पतीने ५०० रुपये घेऊन तिला सोनू शर्माच्या हवाली केले.

त्यानंतर सोनू पीडित महिलेला महरोलीच्या दिशेने एका निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला. तिथे नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ पावलं उचलत तपास सुरू केला. सीकर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक राजेश कुमार आर्य यांनी या प्रकरणाचा उलगडा करत केवळ २४ तासांत आरोपी सोनू आणि पीडितेच्या पतीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार बलात्कारादरम्यान प्रोटेक्शनसाठी वापरण्यात आलेल्या काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आरोपींना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. 

Web Title: With only 500 rupees, the husband handed over his wife to a friend, he raped her