ऑनलाइन गेमिंगचा नाद नडला! शेतकरी बापाला मोबदल्यात मिळाले १.७७ कोटी, लेकानं ऑनलाइन गेमिंगमध्ये उडवले अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:14 IST2026-03-11T13:01:32+5:302026-03-11T13:14:16+5:30

या प्रकरणाची तक्रार डेहराडून येथील सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे. फसवणुकीसाठी वापरलेला मोबाईलही या तरुणाने विकला असल्याचे समोर आले आहे.

Online gaming is a joke! Farmer father got 1 crore 77 lakh as compensation, son blew it in online gaming | ऑनलाइन गेमिंगचा नाद नडला! शेतकरी बापाला मोबदल्यात मिळाले १.७७ कोटी, लेकानं ऑनलाइन गेमिंगमध्ये उडवले अन् मग...

ऑनलाइन गेमिंगचा नाद नडला! शेतकरी बापाला मोबदल्यात मिळाले १.७७ कोटी, लेकानं ऑनलाइन गेमिंगमध्ये उडवले अन् मग...


ऑनलाइन गेमिंग आणि रातोरात पैसे दुप्पट करण्याच्या अमिषाला बळी पडून एका १८ वर्षांच्या तरुणाने आपल्या शेतकरी वडिलांचे थोडो-थोडके नव्हे तर, तब्बल १.७७ कोटी रुपये झटक्यात उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरिद्वार जिल्ह्यातील झबरेडा परिसरात राहणाऱ्या या तरुणाने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विष घेऊन आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला. मात्र सुदैवाने तो बचावला.

अशी झाली फसवणूक -
संबंधित तरुणाचे नाव अभिमन्यू असे आहे.  या तरुणाने जानेवारी २०२५ मध्ये काही गेमिंग ॲप्स डाऊनलोड केले होते. ते बंद पडल्यानंतर यूट्यूबवरील एका जाहिरातीच्या माध्यमातून तो 'विन अड्डा' नावाच्या वेबसाइटच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याला परदेशी कोड असलेल्या (+237, +234, +94 आदि) नंबरवरून व्हॉट्सॲपवर लिंक येऊ लागल्या. सुरुवातीला फसवणूक करणाऱ्यांनी त्याला काहीसा नफाही मिळवून दिला. यामुळे त्याचा विश्वास अधिकच वाढला. या जाळ्यात अडकलेल्या अभिमन्यूने जानेवारी २०२५ ते डिसेंबर 2025 पर्यंत, आपल्या आणि वडिलांच्या पाच वेगवेगळ्या बँक खात्यांतून यूपीआयद्वारे तब्बल १.७७ कोटी रुपये ठगांच्या खात्यात जमा केले.

हा तरुण बीसीएचे शिक्षण घेत आहे. त्याच्या वडिलांना दिल्ली एक्सप्रेसवेसाठी संपादित केलेल्या जमिनीचा सरकारी मोबदला मिळाला होता. जेव्हा तरुणाने नफ्यासह मूळ रक्कम परत मागितली, तेव्हा ठगानी नकार दिला. या प्रकरणाची तक्रार डेहराडून येथील सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे. फसवणुकीसाठी वापरलेला मोबाईलही या तरुणाने विकला असल्याचे समोर आले आहे.
 

Web Title : ऑनलाइन गेमिंग की लत ने किसान को बर्बाद किया; बेटे ने ₹1.77 करोड़ गंवाए।

Web Summary : हरिद्वार में एक 18 वर्षीय युवक ने ऑनलाइन गेमिंग घोटालों में अपने किसान पिता के ₹1.77 करोड़ गंवा दिए। जल्दी मुनाफे के लालच में, उसने यूपीआई के माध्यम से धन जमा किया, फिर धोखाधड़ी का एहसास होने पर आत्महत्या का प्रयास किया। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Online gaming addiction ruins farmer; son loses ₹1.77 crore.

Web Summary : An 18-year-old in Haridwar lost ₹1.77 crore of his farmer father's money to online gaming scams. Lured by quick profits, he deposited funds via UPI, then attempted suicide after realizing the fraud. Police are investigating.