ट्युशन फीच्या नावाने भिवंडीत महिलेची ऑनलाइन फसवणूक
By नितीन पंडित | Updated: January 4, 2023 18:10 IST2023-01-04T18:08:33+5:302023-01-04T18:10:25+5:30
अक्षीता अनिल पटेल यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. तो त्यांची पुतणी भक्ती यांनी उचलला. यावर समोरील व्यक्तीने बऱ्याच महिन्यांपासून आपली ट्युशन फी बाकी असल्याचे सांगत मोबाईलवर ओटीपी नंबर विचारला...

ट्युशन फीच्या नावाने भिवंडीत महिलेची ऑनलाइन फसवणूक
भिवंडी - सध्या सर्वत्र ऑनलाईन आर्थिक व्यवहाराला पसंती दिली जात आहे. याच ऑनलाईन पद्धतीचा वापर करून भिवंडीत एका महिलेची ३७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. कणेरी येथे राहणाऱ्या अक्षीता अनिल पटेल यांच्या सोबत ही घटना घडली.
अक्षीता अनिल पटेल यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. तो त्यांची पुतणी भक्ती यांनी उचलला. यावर समोरील व्यक्तीने बऱ्याच महिन्यांपासून आपली ट्युशन फी बाकी असल्याचे सांगत मोबाईलवर ओटीपी नंबर विचारला. भक्ती यांनी त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मोबाईलवर आलेला ओटीपी सांगितला.
यानंतर अवघ्या काही मिनिटांतच अक्षीता पटेल यांच्या एसबीआय क्रेडिट कार्डमधू ३७ हजार ८३९ रुपये उडाले. याप्रकरणी अक्षीता पटेल यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.