शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून तरूणाची तरूणीकडे शरीरसुखाची मागणी, आई-वडिलांना जीवे मारण्याची दिली होती धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 13:34 IST

Pune Crime News : २३ वर्षीय आरोपीचं नाव कुतुबुद्दीन हबीब काचवाला असून तो कसबा पेठेत राहतो. आरोपी तरूण आणि पीडित तरूणी काही वर्षांपूर्वी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतं होते.

पुणे शहरातून एक एकतर्फी प्रेमातून घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाने एकतर्फी प्रेमातून एका तरूणीकडे शरीरसुखाची मागणी केली. इतकंच नाही तर तो म्हणतो तसं केलं नाही तर तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची त्याने तिला धमकीही दिली आहे. मात्र, तरूणीने हिंमत दाखवत पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलीये.

lokmat.news18.com च्या वृत्तानुसार, आरोपी तरूणाने पीडित तरूणीकडे माझ्याशीच लग्न (Demand for marriage) कर असा तगादा लावला होता. तसेच त्यानं माझ्याशी लग्न नाही केलं, तर तुझ्या आई वडिलांना जीवे (Threat to death) मारेल, अशी धमकीही दिली आहे. मात्र, धमकीला न घाबरता तरूणीने मार्केड यार्ड पोलिसात तक्रार दिली होती. (हे पण वाचा ; धक्कादायक! पत्नीला शेवटचं पाहण्यासाठी मालकाने जाऊ दिलं नाही, रागात नोकराने केला मोठा कारनामा)

२३ वर्षीय आरोपीचं नाव कुतुबुद्दीन हबीब काचवाला असून तो कसबा पेठेत राहतो. आरोपी तरूण आणि पीडित तरूणी काही वर्षांपूर्वी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतं होते. आरोपी तरूण हा तेव्हापासून पीडितेवर एकतर्फी प्रेम करत होता. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच पीडितेनंआरोपीला नकार दिला होता. पण तरीही आरोपी तरुणानं तिचा पिच्छा सोडला नाही. (हे पण वाचा : पतीच्या छळाला कंटाळून महिलेने केली गळफास घेऊन आत्महत्या; कोथरुडमधील घटना)

तरूणाने तरूणीला धमकी दिली होती की, 'तू जर दुसऱ्याशी लग्न करशील, तर त्या मुलाला आणि तुझ्या आई वडिलांना जीवे मारेन'. इतकंच नाही तर त्यानं पीडित तरूणीकडून एक सोन्याची चेन आणि ४० हजार रुपये अशी एकूण ८५ हजार रुपयांची खंडणी देखील उकळली आहे. त्यामुळे आरोपी युवकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून २१ वर्षीय पीडित तरूणीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तरूणीने या तक्रारीत आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देवून शरीरसुखाची मागणी केल्याचंही पीडितेनं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी  कुतुबुद्दीन हबीब काचवालाला राहत्या घरातून अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी