एकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 20:18 IST2020-05-28T20:15:22+5:302020-05-28T20:18:18+5:30

हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान या माथेफिरूचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

one-sided love, the youth killed his brother's sister-in-law by striking her with an axe pda | एकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या

एकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या

ठळक मुद्देही घटना मंगळवारी रात्री १२ वाजता घडली. वहिनीच्या बहिणीनं लग्नासाठी नकार दिल्यानं हा धक्कादायक प्रकार घडला. जलालपूर पोलिस स्टेशन परिसरातील नेवाडा गावात राहणारी हरि कंचन आपली वाहिनी लक्ष्मीची धाकटी बहीण सोनीवर प्रेम करत होता.

जौनपूर - एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने नात्यातील तरुणीची निर्घृण हत्या केली. या घटनेने खळबळ उडाली होती. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील जलालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली. घटनास्थळाहून आरोपी फरार झाला. ही घटना मंगळवारी रात्री १२ वाजता घडली. वहिनीच्या बहिणीनं लग्नासाठी नकार दिल्यानं हा जलालपूर पोलिस स्टेशन परिसरातील नेवाडा गावात राहणारी हरि कंचन आपली वाहिनी लक्ष्मीची धाकटी बहीण सोनीवर प्रेम करत होता. धक्कादायक प्रकार घडला. तरुणीवर माथेफिरून सपासप वार करून नकार दिल्याचा बदला घेतला. घटनास्थळी पोलीस पोहचले आणि पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

जलालपूर पोलिस स्टेशन परिसरातील नेवाडा गावात राहणारी हरि कंचन आपली वाहिनी लक्ष्मीची धाकटी बहीण सोनीवर प्रेम करत होता. तो एकतर्फी प्रेम करत होता आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते. सोनी लग्न करण्यास तयार नव्हती आणि तिने लग्न करण्यास नकार दिला. यामुळे हरि कंचन भावाच्या सासूरवाडीला जमालपूरला पोहोचली. रात्रीचे जेवण झाल्यावर सर्वजण झोपले असता मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास कुऱ्हाडीसह सोनीकडे पोहोचला. नीलम, धाकटी बहीण शेजारी शेजारी झोपली होती. या युवकाने सोनीवर धारदार कुऱ्हाडीने वार केले. जेव्हा नीलमने आरडाओरडा केला तेव्हा लोक तिथे जमायला लागले. हे पाहून आरोपी फरार झाला. सोनीचे वडील मिठाईलाल रोजगारासाठी गुजरातमध्ये राहतात, ते आज सकाळी घरी येणार होते.

पोलिस अधीक्षक संजय कुमार यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. मुलगा रात्री कसा तरी मुलीच्या घरी पोहोचला होता. मुलगा नेवाड्यातील जवळच्या खेड्यातील आहे. हत्येनंतर गावकरी जमेपर्यंत आरोपी मुलगा पळून गेला होता. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान या माथेफिरूचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

 

लॉकडाऊन नियमांंचं उल्लंघन करणाऱ्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी केली अटक

 

वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात 

Web Title: one-sided love, the youth killed his brother's sister-in-law by striking her with an axe pda