धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून घरात घुसून युवतीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 08:06 AM2021-09-24T08:06:31+5:302021-09-24T08:09:15+5:30

खून झालेली मुलगी ही सतरा वर्षांची असून, दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने अकरावीमध्ये प्रवेश घेतला होता.

one-sided love Murder of a girl in satara | धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून घरात घुसून युवतीचा खून

सांकेतिक छायाचित्र

Next

चाफळ (जि. सातारा) : एकतर्फी प्रेमातून प्रियकराने भरदिवसा घरात घुसून अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करत तिचा निर्घृण खून केला. ही खळबळजनक घटना गुरुवारी  सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाटण तालुक्यातील एका गावात घडली.

खून झालेली मुलगी ही सतरा वर्षांची असून, दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने अकरावीमध्ये प्रवेश घेतला होता. अनिकेत मोरे (२०, रा. शिरंबे, कोरेगाव) हा त्या मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. गुरुवारी सकाळी संबंधित मुलगी घरात टीव्ही पाहत होती, तर तिची तीन वर्षांची लहान बहीण अंगणामध्ये खेळत होती. तसेच आई बाहेर गेली होती. यावेळी अनिकेत त्या मुलीच्या घरात गेला. तिला काही कळायच्या आतच त्याने मुलीचे तोंड दाबून धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला. 

मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तो घरातून निघून गेला. खून केल्यानंतर संशयित आरोपी अनिकेतने स्वत: मल्हारपेठ पोलीस ठाण्यात हजर राहून खुनाची कबुली दिली. दरम्यान, अनिकेतने काही दिवसांपूर्वीच मुलीच्या आईची भेट घेऊन लग्नासाठी मागणी केली होती. मात्र, त्यांनी नकार दिल्यानंतर त्याने संतापाच्या भरात हे कृत्य केले.
 

Web Title: one-sided love Murder of a girl in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app