धक्कादायक! आणखी एका तरुणीचे अवयव विहिरीतून काढले, ओळख अद्याप अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 18:48 IST2022-11-15T18:47:39+5:302022-11-15T18:48:36+5:30
दिल्लीतील श्रद्धा वालकर च्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता ही घटना समोर आली आहे.

धक्कादायक! आणखी एका तरुणीचे अवयव विहिरीतून काढले, ओळख अद्याप अस्पष्ट
श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशच्या आजमगढ मध्येही एका तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले आहेत त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. आजमगढ जिल्ह्यातील अहरौला ठाणे क्षेत्रात गौरीकापूरा रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत तरुणीच्या अवयवांचे तुकडे आढळून आले आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असून तपास सुरु केला आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलिसांचे पथक, फॉरेंन्सिक टीम घटनास्थळी पोहचली असून अधिक तपास सुरु आहे.
दिल्लीतील श्रद्धा वालकर च्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता ही घटना समोर आली आहे. आज सकाळीच काही लोक विहिरीजवळून जात असताना त्यांना विहिरीत हे धक्कादायक चित्र दिसले. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. या तरुणीचे वय अंदाजे २२ असल्याची माहिती आहे. सध्या फॉरेन्सिक टीम याचा तपास करत आहे. तरुणाची ओळख पटण्याचा प्रयत्न करत आहे.