शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

गर्लफ्रेन्डला भेटण्यासाठी आला होता १ लाख बक्षीस असलेला अट्टल गुन्हेगार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 14:49 IST

Kanpur Crime News : एसटीएफचा घेराव बघून विक्की पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. अशात तो नाल्यात जाऊन पडला. तो गंभीर जखमी झाला. अशात त्याला एसटीएफने ताब्यात घेतलं. 

गर्लफ्रेन्डला भेटण्याच्या नादात एक लाख रूपये बक्षीस असलेला गुन्हेगार विक्की सोनी पकडला गेलाय. मंगळवारी रात्री गर्लफ्रेन्डला घरी सोडून जात असलेल्या विक्की सोनीचा कानपूरच्या पनकी एसटीएफसोबत सामना झाला. एसटीएफ आणि विक्की यांच्यात गोळीबार झाला. एसटीएफचा घेराव बघून विक्की पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. अशात तो नाल्यात जाऊन पडला. तो गंभीर जखमी झाला. अशात त्याला एसटीएफने ताब्यात घेतलं. 

एसटीएफने विक्कीकडून पिस्तुल आणि जिवंत काडतूस ताब्यात घेतले. विक्की सोनी हा अट्टल गुन्हेगार आहे. तो पोलिसांना चकमा देऊन ३ ऑक्टोबर २०१९ ला कोर्टात हजेरी दरम्यान पळून गेला होता. तो पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत होता. एसटीएफला सर्विलांसच्या माध्यमातून माहिती मिळाली होती की, विक्की सोनी पनकीच्या शताब्दी नगरमध्ये आहे. पोलिसांना वेढा दिला आणि एसटीएफने फायरिंग सुरू केली. संधी पाहून विक्कीचे दोन्ही  साथीदार फरार झाले. (हे पण वाचा : टीव्हीवर मालिका बघत बसलेल्या सासूने केला नाही स्वयंपाक, सूनेने थेट पोलिसांनाच बोलवलं घरी!)

कोण आहे विक्की सोनी?

विक्की सोनीवर हत्येचा, हत्येच्या प्रयत्नाचा, लूटमार, खंडणी अशा केसेस दाखल आहेत. विक्कीने २९ ऑक्टोबर २०१५ ला एका हॉटेलमध्ये रोहित भदौरियाची हत्या केली होती. रोहित भदौरिया हत्याप्रकरण फार जास्त चर्चेत होतं. या हत्याकांडात विक्कीसोबत रामजी मिश्रा आणि रोहित बहेलिया याला तुरूंगात पाठवण्यात आलं होतं.

वापरत नव्हता मोबाइल

बदमाश विक्की सोनी मोबाइलचा फार कमी वापर करत होता. इतकंच नाही तर तो त्याच्याजवळ मोबाइल ठेवतही नव्हता. जेव्हा त्याला कुणासोबत बोलण्याची गरज पडत होती. तेव्हा तो रस्त्यातील कुणाचाही मोबाइल घेऊन त्यावरून बोलत होता. त्यामुळे एसटीएफ त्याचं लोकेशन स्ट्रेस करू शकत नव्हते. त्यांना हेही कळत नव्हतं की, तो शहरात कधी आला आणि कधी शहरातून गायब झाला. (हे पण वाचा : एक्स आर्मी ऑफिसर ६ महिलांना गुलाम बनवून करत होता त्यांचं शोषण; आरोपीला अटक...)

गर्लफ्रेन्डला भेटायला येत होता विक्की

एसटीएफला समजलं होतं की, विक्की सोनीची एक गर्लफ्रेन्ड आहे. तिला भेटण्यासाठी तो नेहमी येत होता. एसटीएफने कशाप्रकारे मुलीचा नंबर घेऊन सर्विलांस आणि लिसनिंगवर टाकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की मंगळवारी गर्लफ्रेन्डसोबत फिरत होता. सायंकाळी त्याने गर्लफ्रेन्ड घरी सोडलं आणि साथीदारांसोबत पनकीमध्ये वसूली करण्यासाठी गेला. तेव्हाच त्याला पकडण्यात आलं.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी