टीव्हीवर मालिका बघत बसलेल्या सासूने केला नाही स्वयंपाक, सूनेने थेट पोलिसांनाच बोलवलं घरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 09:37 AM2021-03-17T09:37:15+5:302021-03-17T09:41:15+5:30

शिळं खाऊन हैराण झालेल्या सूनेने ११२ वर कॉल करून पोलिसांना बोलवलं. त्यानंतर पोलिसांनी दोघींची समजूत काढली आणि वाद मिटवला. 

UP Gorakhpur mother in law tv serial busy food daughter in law troubled dial 112 police crime | टीव्हीवर मालिका बघत बसलेल्या सासूने केला नाही स्वयंपाक, सूनेने थेट पोलिसांनाच बोलवलं घरी!

टीव्हीवर मालिका बघत बसलेल्या सासूने केला नाही स्वयंपाक, सूनेने थेट पोलिसांनाच बोलवलं घरी!

Next

सासू-सूनेच्या भांडणाच्या अनेक विचित्र घटना सतत समोर येत असतात. उत्तर प्रदेशच्या गोरखूरमधूनही सासू-सूनेच्या वादाची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे जेवण बनवण्याच्या गोष्टीवरून दोघींमध्ये वाद झाला. टीव्हीवर मालिका बघत असलेल्या सासूने जेवण तयार करण्यास नकार दिला. तर शिळं खाऊन हैराण झालेल्या सूनेने ११२ वर कॉल करून पोलिसांना बोलवलं. त्यानंतर पोलिसांनी दोघींची समजूत काढली आणि वाद मिटवला. 

मंझगांवातील ही घटना असून येथील एका परिवारात सासू-सून घरात एकट्या राहतात. दोघींचे पती बाहेरगावी नोकरी करतात. दोघी सोबत राहत असल्याने दोघींमध्ये नेहमीच छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात. पोलिसांनुसार, एका महिलेकडून तक्रार आली होती की, तिला तिच्या सासूने शिळं जेवण दिलं. ज्यामुळे तिची तब्येत खराब झाली आहे. अलिकडे रोज सासू तिला शिळं देते. (हे पण वाचा : पतीला दुसऱ्या महिलेसोबत मार्केटमध्ये पाहून भडकली पत्नी, भर रस्त्यात दोघांमध्ये हाणामारी....)

सूचना मिळाल्यावर पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली. तिथे पोलिसांना समजलं की, सासू आणि सूनेचे पती बाहेर राहून नोकरी करतात. घरात केवळ या दोघीच राहतात. त्यामुळे दोघींमध्ये नेहमीच वाद होत राहतात. याबाबत सूनेने सांगितले की, तिची सासू तिला शिळं अन्न देते आणि त्यामुळे ती आजारी पडते. तसेच सासू दिवसभर टीव्ही बघत राहते. (हे पण वाचा : 'शादी डॉट कॉम' वेबसाईटवरून जमवली ओळख; लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार)

पोलिसांनी सांगितले की, सासूचा आरोप आहे की, सून खोटं बोलत आहे. ती सूनेला नेहमी गरम जेवण देते. सून कधीच स्वत:हून स्वयंपाक करत नाही. दिवसभर मोबाईलमध्ये बिझी राहते. पोलीस हजर असतानाही दोघींचं भांडण वाढलं होतं. हे बघून पोलिसांनी दोघींनाही समजावून सांगितलं. तसेच यानंतर असं केलं तर कारवाई करण्यात येईल असंही त्यांना सांगितलं.

Web Title: UP Gorakhpur mother in law tv serial busy food daughter in law troubled dial 112 police crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.