बालेवाडी येथे ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 14:30 IST2019-11-04T14:26:01+5:302019-11-04T14:30:18+5:30
बालेवाडी येथे शनिवारी (दि.२) दुपारी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान हा अपघात झाला...

बालेवाडी येथे ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू झाला. बालेवाडी येथे शनिवारी (दि.२) दुपारी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार बसवराज पाटील (वय ३०) असे या अपघातातमृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जगदेवी कल्याणी हावशेट्टी (वय ३५, रा. भगवतीनगर, सुतारवाडी, पाषाण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, बापू सिद्धनाथ गौडा (वय २७, रा. कुंदूर, ता. शिगाव, जि. हवेली, कर्नाटक) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.
फिर्यादी जगदेवी आणि त्यांचा भाऊ शिवकुमार हे दोघे शनिवारी दुपारी मुंबई-बेंगळुरू महामार्गावरून बालेवाडी येथे जुना जकात नाक्यासमोर आले. त्यानंतर तेथे गाडी थांबवून शिवकुमार पाटील रस्ता क्रॉस करीत होते. त्यावेळी आरोपी गौडा याने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव चालवून शिवकुमार यांना धडक दिली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.