गोव्यात मडगावात रेल्वेच्या धडकेने एक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 20:07 IST2020-10-19T20:07:30+5:302020-10-19T20:07:54+5:30

Train Accident : अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.

One killed in train accident in Madgaon, Goa | गोव्यात मडगावात रेल्वेच्या धडकेने एक ठार

गोव्यात मडगावात रेल्वेच्या धडकेने एक ठार

ठळक मुद्देकोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय राणे पुढील तपास करीत आहेत. मृतदेह मोतीडोंगर येथील क्षयरुग्ण इस्पितळाच्या शवागरात ठेवला आहे.

मडगाव : रेल्वेने धडक दिल्याने गोव्यात मडगावात एक अज्ञात इसम ठार झाला. आज सोमवारी पेडा कोंबा येथे ही घटना घडली. मयत अंदाजे ४५ ते ५0 वयोगटातील असून, त्याची ओळख अजूनही पटली नाही अशी माहिती कोकण रेल्वे पोलिसांनी दिली. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय राणे पुढील तपास करीत आहेत. मृतदेह मोतीडोंगर येथील क्षयरुग्ण इस्पितळाच्या शवागरात ठेवला आहे.
































































ट च्






 

Web Title: One killed in train accident in Madgaon, Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.