तळोजा रस्त्यावरील अपघातात एक ठार तर एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 16:52 IST2021-12-07T16:52:06+5:302021-12-07T16:52:32+5:30
Taloja road accident : उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळोजा रस्त्यावरून रविवारी मध्यरात्री रोहन दांडेकर हा मित्र विनिकेत उपासने याच्या सोबत इंडिका कारने नवीमुंबईला जात होते.

तळोजा रस्त्यावरील अपघातात एक ठार तर एकजण जखमी
सदानंद नाईक
उल्हासनगर : तळोजा रस्त्यावर रविवारी मध्यरात्री एका इंडिका कारला कंटेनरने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा मुंबई येथील रुग्णालयात मृत्यूशी झुज देत आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात कंटेनर चालकांवर गुन्हा दाखल केला.
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळोजा रस्त्यावरून रविवारी मध्यरात्री रोहन दांडेकर हा मित्र विनिकेत उपासने याच्या सोबत इंडिका कारने नवीमुंबईला जात होते. मध्यरात्री इंडिका कारला एका कंटेनरने जोरदार धडक देऊन वाहन चालक फरार झाला. या अपघातात डोंबिवली येथे राहणारे सुधीर दांडेकर यांचा मुलगा रोहन व त्याचा मित्र विनिकेत उपासने गंभीर जखमी झाले. रोहन दांडेकर यांचा तपासल्या नंतर मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर गंभीर जखमी असलेला विनिकेत उपासने एका खाजगी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. याप्रकारने परिसरात हळहळ व्यक्त होत असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास हिललाईन पोलीस करीत आहेत.