शिवाजी नगरमध्ये मोबाइल शूटिंगच्या वादातून एकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 22:07 IST2019-07-22T22:04:46+5:302019-07-22T22:07:48+5:30
याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला

शिवाजी नगरमध्ये मोबाइल शूटिंगच्या वादातून एकाची हत्या
मुंबई - मोबाईलमध्ये अटक आरोपीचा व्हिडीओ शूट केल्याचा राग मनात ठेवून आरोपीने हाणामारी करून जीवे ठार मारले. ही घटना आज सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद शकील उर्फ आशु मोहम्मद इद्रिस शेख (२७) राहणारा रिजवीया मस्जिदीजवळ, पद्मानगर रोड नं १४, बैगणवाडी, शिवाजीनगर, गोवंडी हे व त्यांचा मित्र शिबु उर्फ मोहम्मद आसीफ(२२) हे मटटी रोड नं. १५ कडे जाणारा मार्ग, सज्जा गारमेंट समोर, बैंगणवाडी, गोवंडी या ठिकाणी असताना यातील २ अटक आरोपी हे त्यांच्या हातात तलवार व लोखंडी रॉड घेऊन त्या ठिकाणी उभे असताना फिर्यादीचा मित्र शिबु उर्फ मोहम्मद आसीफ याने त्याच्या मोबाईल फोनमध्ये यातील अटक आरोपी यांची व्हिडीओ शुटींग केली. त्याचा राग मनात ठेवून यातील अटक आरोपी यांनी फिर्यादी यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड व तलवारीने मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी यांचा मित्र शिबु उर्फ मोहम्मद आसीफ याच्या डोक्यावर, गळयावर, पोटावर तलवारीने व लोखंडी रॉडने मारून जीवे ठार मारले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कलम ३०२,३०७,३४ भा.दं.वि. सह कलम ४,२५,२७ भा.ह.का. सह कलम ३७ (१)(अ), १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.