One died and two were injured in a knife attack | चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू तर दोनजण जखमी

चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू तर दोनजण जखमी

ठळक मुद्देआरोपी अरविंद यादवला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली केली आहे. आरोपी अरविंद यादव हा  शिवाजी नगर येथे राहत असून त्याच्या शेजारी राहणाऱ्या महिलेवर पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करून गंभीर जखमी केले.

मुंबई - आज दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेवर चाकू हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले. या चाकू हल्ल्यात महिलेला वाचविण्यास मध्ये पडलेल्या एक इसमाचा मृत्यू झाला. जयेश गुप्ता असं या मृत इसमाचे नाव आहे. आरोपी अरविंद यादवला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली केली आहे. 

आरोपी अरविंद यादव हा  शिवाजी नगर येथे राहत असून त्याच्या शेजारी राहणाऱ्या महिलेवर पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यावेळी लोकांनी मध्यस्थी करून महिलेले वाचविले. मात्र, त्यानंतर आरोपीने मध्ये पडलेल्या लोकांवर चाल करून चाकूने हल्ला केला. या चाकू हल्ल्यात  जयेश गुप्ता याचा मृत्यू झाला व दोन इसम किरकोळ जखमी झाले. 

Web Title: One died and two were injured in a knife attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.