One died and two injured in accident on highway | मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातात एक ठार,  दोघे जखमी      
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातात एक ठार,  दोघे जखमी      

कामशेत : मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला कार धडकून झालेल्या अपघातात कारमधील एक जण ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  महेश नवनाथ कदम ( वय २५ ) याचा मृत्यू झाला. तर सतीश वसंत भोसले ( वय २९ वर्ष ), प्रदीप राजाभाऊ कोकाटे ( वय ३१ वर्ष, सर्व रा. हावरगाव, उस्मानाबाद ) यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.  मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास पुणे लेनवर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला ( एमएच. ४३ बीपी. ९८९९ ) कारने ( एमएच.१२ केएन.९६१८ ) धडक दिली. अपघातात एक जणाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असुन दोनजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोमाटणे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 

Web Title: One died and two injured in accident on highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.