शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज देण्याच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 23:43 IST

गुन्हा दाखल : शोधासाठी विशेष पथक


लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दोन कोटींचे कर्ज मिळवून देण्यासाठी दोन नामांकित कंपन्यांच्या नावाखाली एका फार्मास्युटिकल कंपनीच्या उपाध्यक्षाची एक कोटी रुपयांची आॅनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला असून, आरोपींच्या शोधासाठी एका विशेष पथकाची निर्मिती केली आहे.
ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक-२ येथील वसंत विहार भागातील ५१ वर्षीय गृहस्थ हे वागळे इस्टेट येथील एका फार्मास्युटिकल कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. एका इंग्रजी सायं दैनिकात प्रसिद्ध झालेली ‘पारस फायनान्स’ गव्हर्नमेंट अ‍ॅप्रूव्हल मार्कशीट, अ‍ॅग्रीकल्चर, बिझनेस आणि पर्सनल लोन २४ तासांत मिळेल, अशी जाहिरात त्यांनी वाचली होती. या जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाइलवर त्यांनी संपर्क साधला. हा फोन सुनील चव्हाण या व्यक्तीने घेतला. त्याच्याकडे कर्जाबाबतची चौकशी केली, तेव्हा त्याने आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. त्याने दिलेल्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर त्यांनी कागदपत्रेही पाठवली. ती पडताळून तुम्हाला दोन कोटींचे कर्ज मंजूर होईल, असे त्यांना भासवले, पण काही शुल्क भरावे लागेल, असेही त्यांना सांगण्यात आले. वेगवेगळ्या शुल्कांच्या नावाखाली या उपाध्यक्षांकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर १४ लाखांची रक्कम घेण्यात आली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुढची रक्कम भरली नाही. मात्र, कर्जाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी एका मोठ्या वित्तीय कंपनीच्या मोबाइलवर संपर्क साधला. तिथेही त्यांच्याकडून ८७ लाख ५० हजारांची आॅनलाइन फसवणूक करण्यात आली. या दोन्ही कथित फायनान्स कंपन्यांनी मिळून जुलै ते आॅक्टोबर, २०१९ या कालावधीत त्यांची सुमारे एक कोटी एक लाख ६४ हजारांची फसवणूक केली. त्यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, चौकशी करून २१ सप्टेंबर, २०२० रोजी दोन वित्तीय कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.