शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला गुन्ह्यात अडकवण्याचा कट व्यावसायिकावर उलटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 19:27 IST

खोट्या नोटांच्या तस्करी प्रकरणी झाली अटक

ठळक मुद्दे राहुलने हे बनावट पैसे कुठून आणले याची चौकशी वांद्रे पोलीस करत आहेत.पोलिसांनी सीसीटिव्ही फूटेजच्या मदतीने पैसे जमा करणाऱ्या मॉडेलला अटक केली.मॉडेलच्या चौकशीत तिला ते पैसे राहुलने शरीरसंबध ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले.

मुंबई - सूड घेण्याच्या भावनेतून तिसऱ्यालाच अडकवण्यासाठी गुजरातच्या व्यावसायिकाने दिलेल्या बनावट नोटा त्याच्या स्वतःच्याच अंगलट आली आहे. बनावट नोटांची बाजारात तस्करी केल्याच्या गुन्ह्यात एका व्यावसायिकासह वांद्रे पोलिसांनी एका २८ वर्षीय मॉडेलला ही अटक केली आहे. राहुल बोराडे (२९) असे या आरोपीचे नाव आहे. मॉडेलच्या चौकशीत तिला ते पैसे राहुलने शरीरसंबध ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी राहुलच्या शोध सुरू केला. मोबाईल लोकशननुसार राहुल हा गुजरातच्या अहमदाबादमध्ये असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी त्याला गुजरातहून अटक केली. राहुलच्या चौकशीत त्याने  मध्यस्थी महिलेशी झालेल्या वादातून तिला धडा शिकवण्यासाठी तरुणीजवळ बनावट नोटा दिल्याची कबूली दिली. हे पैसे तरुणी मध्यस्थी महिलेला देईल, असा राहुलचा समज होता. मात्र तरुणीने तसे न करता ते पैसे स्वतःच्या खात्यावर जमा केल्याने हे प्रकरण बाहेर आले. या प्रकरणी पोलिसांनी मॉडेलसह राहुलला अटक केली आहे. तसेच राहुलने हे बनावट पैसे कुठून आणले याची चौकशी वांद्रे पोलीस करत आहेत.

गुजरात येथील अहमदाबाद परिसरात व्यवसाय असलेला राहुल महिन्यातून एकदा मुंबईत कामानिमित्त येत असे. स्त्रीलंपट असलेला राहुल मुंबईत आला की महिलांवर अफाट पैसे उधळायचा. यातूनच त्याची ओळख एका महिलेशी झाली होती. राहुल मुंबईत आला की तो त्या मध्यस्थी महिलेला फोन करून शरीर संबधांसाठी तरुणींची मागणी करायचा. त्यानुसार मध्यस्थी महिला राहुलकडे तरुणींना जाण्यास सांगायची. मात्र, एका व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे मध्यस्थी महिलेला त्याला धडा शिकवायचा होता. दरम्यान एप्रिल महिन्यात राहुल मुंबईत आला होता. यावेळी त्याने त्या मध्यस्थी महिलेशी संपर्क साधून शरीर संबधाची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मध्यस्थी महिलेने एका मॉडेलला राहुल थांबला असलेल्या सांताक्रूझमधील पंचतारांकीत हॉटेलात पाठवले. तरुणीला निघताना राहुलने ८४ हजार रुपये दिले. ते पैसे तरुणीने तिच्या एटीएम शाखेतून तिच्या खात्यावर वळवले. दुसऱ्यादिवशी एटीएमचे पैसे बँकेत जमा करण्यात आल्यानंतर तपासणीत बँकेतील कर्मचाऱ्यांना २ हजाराच्या ४२ नोटा बनावट असल्याचे आढळून आले. हे पैसे ज्या एटीएममधून जमा करण्यात आले होते. तेथील सीसीटिव्ही फूटेज तपासले असता ते एका तरुणीने वांद्रे येथील बँकेच्या एटीएममध्ये पैसे जमा केल्याने निष्पन्न झाल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी वांद्रे पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटिव्ही फूटेजच्या मदतीने पैसे जमा करणाऱ्या मॉडेलला अटक केली.

मॉडेलच्या चौकशीत तिला ते पैसे राहुलने शरीरसंबध ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी राहुलच्या शोध सुरू केला. मोबाईल लोकशननुसार राहुल हा गुजरातच्या अहमदाबादमध्ये असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी त्याला गुजरातहून अटक केली. राहुलच्या चौकशीत त्याने  मध्यस्थी महिलेशी झालेल्या वादातून तिला धडा शिकवण्यासाठी तरुणीजवळ बनावट नोटा दिल्याची कबूली दिली. हे पैसे तरुणी मध्यस्थी महिलेला देईल, असा राहुलचा समज होता. मात्र तरुणीने तसे न करता ते पैसे स्वतःच्या खात्यावर जमा केल्याने हे प्रकरण बाहेर आले. या प्रकरणी पोलिसांनी मॉडेलसह राहुलला अटक केली आहे. तसेच राहुलने हे बनावट पैसे कुठून आणले याची चौकशी वांद्रे पोलीस करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकSex Racketसेक्स रॅकेटWomenमहिलाPoliceपोलिस