शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

नालासोपारा स्फोटके प्रकरणात बॉम्बचे प्रशिक्षण देणारा अटकेत, एटीएसची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 6:34 AM

नालासोपारा स्फोटके प्रकरणातील आरोपींना गावठी बॉम्बचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रताप जुदीष्टर हाजरा उर्फ प्रताप हाजरा (३४) याला पश्चिम बंगाल येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मुंबई : नालासोपारा स्फोटके प्रकरणातील आरोपींना गावठी बॉम्बचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रताप जुदीष्टर हाजरा उर्फ प्रताप हाजरा (३४) याला पश्चिम बंगाल येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राज्य दहशतवादविरोधी पथकाने पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील हा तेरावा आरोपी आहे.नालासोपारा स्फोटके प्रकरणात एटीएसने १० आॅगस्ट २०१९पासून अटकसत्र सुरू करीत नालासोपारा, पुणे, औरंगाबाद, जालना आणि मुंबईतून शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगरकर आणि अविनाश पवार यांच्यासह वासुदेव सूर्यवंशी उर्फ मॅकेनिक (१९), लीलाधर लोधी उर्फ विजय उर्फ लंबू उर्फ भय्या (३२), सुजीथ कुमार उर्फ सुजीथ एस. आर. उर्फ मंजुनाथ उर्फ प्रवीण रंगास्वामी (३७) आणि भारत कुरणे उर्फ अंकल (२७), अमोल काळे उर्फ भाईसाहेब उर्फ संजय भन्सारे (३४), अमित बड्डी उर्फ गोविंदा (२७), गणेश मिसकीन उर्फ मिथुन (२८) अशा एकूण १२ जणांना अटक केली. हिंदूराष्ट्र निर्मितीच्या उद्देशाने एकत्र आलेल्या या तरुणांच्या दहशतवादी टोळीने पिस्तुले, गावठी बॉम्ब तयार करून हिंदू धर्म, रूढी, प्रथा-परंपरा यांना विरोध, विडंबन, लिखाण आणि वक्तव्य करणाºया व्यक्ती आणि कार्यक्रमांना लक्ष्य करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला होता.डिसेंबर २०१७ मध्ये पुण्यात आयोजित सनबर्न फेस्टिव्हलला लक्ष्य करण्यासाठी या टोळीने रेकी करून घातपाताची तयारीही केली होती. मात्र हा कट पूर्णत्वास गेला नाही. टोळीने साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक व्यक्तींना लक्ष्य करून रेकी केल्याचेही एटीएसच्या तपासात उघड झाले होते.या आरोपींविरुद्ध ५ डिसेंबर २०१९ रोजी दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. आरोपींच्या चौकशीतून हाजराने त्यांना गावठी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर आली. तसेच पुण्यातील सनबर्न या पाश्चिमात्य संगीत महोत्सवात गावठी बॉम्ब फेकून निषेध नोंदविण्याच्या कटात हाजरा सहभागी होता. त्यानुसार, एटीएस पथक त्याच्या मागावर होते. मात्र गुन्हा दाखल होताच हाजरा फरार झाला.याच दरम्यान हाजरा पश्चिम बंगालच्या उष्टी जिल्ह्यात असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानुसार, एटीएस प्रमुख देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पश्चिम बंगालला रवाना झाले. तेथे कोलकाता एसटीएफ आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने तपासाअंती सोमवारी त्याला अटक करण्यात आली.३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीहाजरा याला गुरुवारी मुंबई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हाजरा हा मूळचा पश्चिम बंगालच्या उष्टी जिल्ह्यातील नैनापूरमधील रहिवासी आहे. या प्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNalasopara Arms Haulनालासोपारा शस्त्रसाठा