महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 16:10 IST2019-02-01T16:09:58+5:302019-02-01T16:10:50+5:30
बाणेर येथून कोथरुडला महिलेला मोटारीतून सोडविण्यासाठी जात असताना मोटारचालकाने महिलेचा विनयभंग केला.

महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बाणेर येथून कोथरुडला महिलेला मोटारीतून सोडविण्यासाठी जात असताना मोटारचालकाने महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना मुंबई-बेंगलोर महामार्गावरील सुसखिंड पाषाण ते बावधान या दरम्यान गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.
राजेश सौरव बाराते (वय २०, रा.मारुती मंदीरजवळ, रावेत गावठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास फिर्यादी महिलेला बाणेर येथून कोथरुड येथील जनावरांच्या दवाखान्यात जायचे होते. यासाठी ती महिला ओला कंपनीच्या मोटारीतून मुंबई-बेंगलोर महामार्गाने जात असताना या मोटारीचा चालक आरोपी राजेश बाराते याने महिलेचा विनयभंग केला. ड्रायव्हर सिटच्या शेजारी बसलेल्या या महिलेला गिअर बदलण्याच्या बहाण्याने वारंवार स्पर्श करीत अश्लिल चाळे करीत होता. दरम्यान, याबाबत महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीला जेरबंद करण्यात आले.