पिंपरी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास तोंडावर अॅसिड फेकण्याची धमकी दिल्याप्रकरणी भोसरीपोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी दापोडी येथे घडली.जोसेफ अँन्थोनी देवनेसन (वय ४०, रा, महात्मा फुले नगर, मराठी शाळेजवळ, दापोडी ) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित १६ वर्षीय मुलगी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता दापोडीतील हुतात्मा शाळेसमोरील रस्त्यावर टिकली घेण्यासाठी आली होती . त्यावेळी आरोपीने तिचा विनयभंग केला. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास तोंडावर अॅसिड टाकून चेहरा विद्रुप करण्याची धमकी दिली. त्यानंतर कुठे तोंड दाखविण्याच्या लायक राहणार नाही,अशीही धमकी दिली.यापूवीर्ही आरोपीने दोन ते तीनवेळा पीडित मुलीचा पाठलाग केला होता याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीला तोंडावर अॅसिड फेकण्याची धमकी देणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 14:02 IST