मन सुन्न करणारी घटना! वडिलासह दीड वर्षाचे बाळ गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 15:58 IST2021-05-28T15:57:36+5:302021-05-28T15:58:22+5:30
Suicide Case : दोघांच्या मृत्यूने कुंदेगावात समाजमन सुन्न

मन सुन्न करणारी घटना! वडिलासह दीड वर्षाचे बाळ गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले
संग्रामपूर (बुलडाणा) : दिड वर्षाच्या बाळासह वडिल एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कुंदेगाव येथे समाजमन सुन्न झाले आहे. शुक्रवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मृतक दिनेश पुंडलिक वानखडे (वय-३०) व दीड वर्षाचा मुलगा रोशन दिनेश वानखडे हे दोघेही कुंदेगाव शिवारातील एका निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. शेतातील निंबाच्या झाडाला वडील दोरीच्या साह्याने तर दीड वर्षीय बाळ दुपट्ट्याच्या साह्याने लटकलेल्या अवस्थेत दिसून आले आहे. मृतकाचा भाऊ राजेश पुंडलिक वानखडे याने तामगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अकास्मिक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. नंदकिशोर तिवारी करीत आहे. वडिलांसह दीड वर्षाचा मुलगा झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून समाजमन सुन्न झाले आहे.
महिलेसोबत दुष्कर्म, मारहाणप्रकरणी एका तरुणीसह ६ अवैध बांगलादेशी नागरिक अटकेत https://t.co/C2rbqIzir0
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2021