"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:53 IST2025-08-12T16:53:07+5:302025-08-12T16:53:42+5:30
प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी पोलिसांना एक व्हिडिओ सापडला, जो आत्महत्येच्या आधीचा आहे

"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
वाराणसी - "माझ्या घरात बाहेरून कोण येते, हे विचारण्याचा माझा अधिकार आहे की नाही? हेच विचारले असता पत्नीने माझ्याच मुलीच्या हातून मला मारले. भावांनो, असं आयुष्य कोण जगेल" असं विचारात सोमवारी एका व्यापाऱ्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. मनोज कुमार गोड असं मृत व्यक्तीचे नाव आहे.
केशवपूर येथील रहिवासी मनोज गोड यांनी मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा व्हिडिओ काढून पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पिस्तुल जप्त केली. मनोज कुमार यांचं बिल्डिंग मटेरिअलचं दुकान होते. ते प्रॉपर्टी व्यवसायही करत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि २ मुली होत्या. सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास कुटुंबाने मनोज यांच्या खोलीतून बंदुकीचा आवाज ऐकला. त्यानंतर घरातील सदस्य खोलीच्या दिशेने धावले, तिथे दरवाजा उघडून पाहताच मनोज रक्ताच्या थारोळ्यात खुर्चीवर पडल्याचे दिसून आले. शेजारीच पिस्तुल पडली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी पोलिसांना एक व्हिडिओ सापडला, जो आत्महत्येच्या आधीचा आहे. बंदूक मनोजकडे कशी आली याचा तपास सुरू आहे. पोस्टमोर्टम रिपोर्ट आणि साक्षीदार याआधारे पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेवर अद्याप कुटुंबाकडून कुठलीही तक्रार अथवा जबाब आला नाही असं अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रशेखर यांनी सांगितले.
मृत्यूपूर्वीचा दीड मिनिटांचा व्हिडिओ...
मृत्यूपूर्वी मनोज कुमारने बनवलेल्या व्हिडिओत म्हटलंय की, हॅलो मित्रांनो, आज माझ्या आयुष्यातील अखेरचा दिवस आहे. आज माझीच मुलगी मला मारहाण करत आहे अशी वेळ आली आहे. हे आयुष्य जगण्यासारखे नाही. आज माझी स्थिती सगळे पाहत असतील. माझ्या घरात कुणीही बाहेरचा व्यक्ती आला तर त्याच्याबद्दल मी विचारायचे नाही का..मी याचा विरोध केला तर माझ्या मुलीकडून मला मारण्यात आले असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी मनोज कुमार गोड आदिवासी कार्यक्रमात गेले होते. सोमवारी बाहेरील व्यक्तीला घरात आणण्यावरून पती-पत्नीत वाद झाला. याआधी कुटुंबात कुठला वाद झाल्याचे समोर आले नव्हते असं शेजाऱ्यांचे म्हणणं आहे.