एकामागोमाग एक 50 फैरी झाडल्या; आरएलडी नेत्याच्या ताफ्यावर तुफान गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 22:58 IST2021-12-05T22:58:29+5:302021-12-05T22:58:59+5:30
आरएलडी नेता आणि माजी ब्ल़ॉक प्रमुख हाजी युनुसवर हा हल्ला रविवारी झाला. एका लग्नसोहळ्यावरून ते परतत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकरत्यांचाही ताफा होता.

एकामागोमाग एक 50 फैरी झाडल्या; आरएलडी नेत्याच्या ताफ्यावर तुफान गोळीबार
बुलंदशहरमध्ये आज राजकारणात मोठी खळबळ उडविणारी घटना घडली आहे. एका आरएलडी नेत्याच्या ताफ्यावर झालेल्या तुफान गोळीबारात पाच जण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. एकाच वेळी 50 हून अधिक गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरएलडी नेता हाजी युनुसच्या हाताला गोळी लागली आहे.
आरएलडी नेता आणि माजी ब्ल़ॉक प्रमुख हाजी युनुसवर हा हल्ला रविवारी झाला. एका लग्नसोहळ्यावरून ते परतत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकरत्यांचाही ताफा होता. भाईपूर गावाजवळ त्यांचा ताफा पोहोचताच लपलेल्या हल्लेखोरांनी अॅटोमॅटीक बंदुकींतून फायरिंग सुरु केली. जवळपास 50 हून अधिक फैरी झाडण्यात आल्या.
गेल्या सहा महिन्यांपासून हाजी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत होता. यासाठी त्याने एसएसपीकडे सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याला कोणताही सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. हाजीने आपल्या मोठा भावाच्या मुलावर संशय व्यक्त केला आहे. हाजीचा मोठा भाऊ अलीची त्याने हत्या केली असून तो सध्या डासना तुरुंगात आहे. एसएसपी संतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, अनसची या प्रकरणी चौकशी केली जाणार आहे.