लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:52 IST2026-04-06T14:51:49+5:302026-04-06T14:52:02+5:30

Agra Crime News: आग्र्यामध्ये लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवासोबत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नववधूचे सत्य समोर आल्यानंतर नवरदेवाने पोलिसांत तक्रार केली आहे.

On the first night of the wedding, the bride and groom went straight to the police station; Shocking incident in Agra | लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना

लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना

उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये लग्नाच्या पहिल्याच रात्री एका नवरदेवासोबत असा काही प्रकार घडला की, त्याला थेट पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली. सुहागरात्रीच्या वेळी नववधूचे सत्य समोर आल्यानंतर आपल्यासोबत मोठी फसवणूक झाल्याचा आरोप करत नवरदेवाने पोलिसांकडे दाद मागितली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आग्रा येथील एका तरुणाचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. सर्व विधी आटोपून वरात घरी आली आणि रात्री सुहागरातीची तयारी झाली. मात्र, नवरदेव जसा खोलीत गेला आणि त्याने पत्नीला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला तिच्या शरीरयष्टीमध्ये काहीतरी वेगळेपण जाणवले. संशय आल्याने त्याने अधिक विचारपूस केली असता, त्याला समजले की ज्या मुलीशी त्याचे लग्न लावून दिले आहे, ती प्रत्यक्षात 'किन्नर' आहे.

फसवणुकीचा आरोप
नवरदेवाचा आरोप आहे की, मुलीच्या घरच्यांनी आणि मध्यस्थांनी ही बाब जाणीवपूर्वक लपवून ठेवली. लग्नासाठी मोठा हुंडा आणि दागिनेही देण्यात आले होते. स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेवाने तातडीने पोलीस स्टेशन गाठले आणि सासरच्या मंडळींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

पोलीस तपास सुरू
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. नववधूची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून, त्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. दोन्ही बाजूंच्या कुटुंबांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title : पहली रात दूल्हे को पता चला दुल्हन ट्रांसजेंडर है; शिकायत दर्ज।

Web Summary : आगरा में, एक दूल्हे को अपनी शादी की रात पता चला कि उसकी दुल्हन ट्रांसजेंडर है। धोखाधड़ी का आरोप लगाते हुए, उसने दुल्हन के परिवार के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज कराई, जिसका दावा है कि उन्होंने सच्चाई छिपाई और दहेज लिया। पुलिस जांच कर रही है, जिसमें दुल्हन की मेडिकल जांच भी शामिल है।

Web Title : Groom discovers bride is transgender on first night; files complaint.

Web Summary : In Agra, a groom discovered his bride was transgender on their wedding night. Alleging fraud, he filed a police complaint against her family, who he claims concealed the truth and took dowry. Police are investigating, including a medical examination of the bride.