क्रूरता! चोरीच्या संशयावरून निष्पाप मुलाला ओलीस ठेवून दिले गरम चिमट्याचे चटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 20:39 IST2022-08-04T20:38:38+5:302022-08-04T20:39:05+5:30
Cruelty Case : सध्या बालकाला डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे उपचार सुरू आहेत.

क्रूरता! चोरीच्या संशयावरून निष्पाप मुलाला ओलीस ठेवून दिले गरम चिमट्याचे चटके
देशाच्या राजधानीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लोखंडी सळ्या चोरल्याच्या संशयावरून महिलेने १० वर्षाच्या चिमुरडीला बंधक बनवून बेदम मारहाण केली आणि ओलीस ठेवल्यानंतर तिच्यावर गरम चिमट्याने चटके दिले. सध्या बालकाला डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालक उत्तम नगर येथील राज बिहार येथे कुटुंबासह राहतो. आई-वडील थोड्याच अंतरावर असलेल्या एक्सपोर्ट कंपनीत काम करतात. रात्री 9.30 वाजता त्यांच्या मुलाला एका महिलेने ओलिस ठेवल्याचे कुटुंबियांना समजले. यानंतर कुटुंबीय अंजू (आरोपी महिला) च्या घरी पोहोचले. मूल वेदनेने ओरडत असल्याचे पाहिले. ज्याला डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे मुलावर उपचार सुरू आहेत. मुलाच्या शरीरावर 20 हून अधिक जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत.
नातेवाइकांच्या तक्रारीवरून उत्तम नगर पोलिसांनी आरोपी महिला अंजू हिला मारहाण आणि ओलीस ठेवण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिला अंजूने सांगितले की, मुलगा घराबाहेर खेळत होता. यादरम्यान त्याने तेथून काही सळ्या उचलल्या. मुलाने सळ्या चोरल्याचा संशय तिला आला. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करून त्याच्या अंगावर गरम चिमट्याने चटके दिले.