CCTV: ते आले...कार अडवली..काच फोडली, बंदुक दाखवली अन् डिक्कीतून तब्बल २ कोटी लुटले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 20:29 IST2022-03-30T20:28:52+5:302022-03-30T20:29:49+5:30
दिल्लीतील रोहिणी सेक्टर 24 मध्ये सुमारे दोन कोटी रुपये लुटल्याची घटना घडली आहे. बाइकस्वार चोरांनी कार थांबवून काच फोडून डिक्कीमधून नोटांनी भरलेल्या तीन बॅग्स घेऊन पोबारा केला.

CCTV: ते आले...कार अडवली..काच फोडली, बंदुक दाखवली अन् डिक्कीतून तब्बल २ कोटी लुटले!
नवी दिल्ली-
दिल्लीतील रोहिणी सेक्टर 24 मध्ये सुमारे दोन कोटी रुपये लुटल्याची घटना घडली आहे. बाइकस्वार चोरांनी कार थांबवून काच फोडून डिक्कीमधून नोटांनी भरलेल्या तीन बॅग्स घेऊन पोबारा केला. मंगळवारी रात्री घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फुटेजमध्ये तीन दरोडेखोर गुन्हा करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक नरेंद्र कुमार अग्रवाल हे त्यांचे नातेवाईक करण अग्रवाल यांच्यासह चांदणी चौकातून पैसे घेऊन घरी येत होते. त्यांचा ड्रायव्हर धर्मेंद्र कार चालवत होता.
दिल्ली के रोहिणी सेक्टर 24 में 1 करोड़ 97 लाख की लूट,स्कूटी सवार 3 बादमाशों ने पहले एक कारोबारी की कार का शीशा तोड़ा ,फिर पिस्टल दिखाकर डिग्गी से रुपये से भरे तीन बैग ले गए,वारदात मंगलवार रात 9 बजे की ,सीसीटीवी में कैद हुई वारदात pic.twitter.com/ynJ6IZ0jXy
— Mukesh singh sengar मुकेश सिंह सेंगर (@mukeshmukeshs) March 30, 2022
रात्री नऊच्या सुमारास बाइकवरुन आलेल्या दोघांनी त्यांची कार थांबवली. कारची काच फोडून पिस्तुलचा धाक दाखवून कारची डिक्की उघडण्यास भाग पाडलं. त्यानंतर डिक्कीत नोटांनी भरलेल्या तीन बॅग्स घेऊन चोरांनी पळ काढला. लुटलेली एकूण रक्कम १ कोटी ९७ लाख इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना मिळालं आहे.