डोंगरीच्या बातमीसाठी तरुणीचा मोबाईल घेतला, पण पॉर्न सर्च करून फसला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 17:52 IST2019-07-17T17:48:52+5:302019-07-17T17:52:48+5:30
याप्रकरणी तक्रार प्राप्त नसून आमची टेक्निकल टीम शोध घेईल असे सांगितले.

डोंगरीच्या बातमीसाठी तरुणीचा मोबाईल घेतला, पण पॉर्न सर्च करून फसला!
मुंबई - मुंबईतील एका तरुणीने तिला आलेला एक धक्कादायक अनुभव Garam Sankat या ट्विटर अकाउंटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काही तासांनंतर हे ट्विटर अकाउंट डिलिट करण्यात आले आहे. या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे की नाही हे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांना विचारले असता त्यांनी याप्रकरणी तक्रार प्राप्त नसून आमची टेक्निकल टीम शोध घेईल असे सांगितले.
काल डोंगरी येथे इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक आणि दुःखद घटनेनं मुंबईत खळबळ माजली होती. मात्र दुसरीकडे एका तरुणीसोबत थरारक गोष्ट घडली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, Garam Sankat या ट्विटर हँडलवरून एक धक्कादायक अनुभव या तरुणीने लोकांसमोर मांडला आहे. या पोस्टमध्ये तरूणीने असं नमूद केलं आहे की, मी हॉस्टेलला परत जात असताना एका वयोवृद्धाने मला थांबवलं. त्याने माझ्याकडे इंटरनेट असलेला मोबाईल आहे का विचारलं. डोंगरीतील इमारत पडल्याची बातमी मला दाखवशील का असं विचारलं. यावर मी त्याला एक बातमी दाखवली. त्यावर त्याने इंटरनेटवर सगळं मिळतं का असा प्रश्न विचारला. यावर मी त्याला हो म्हणाले. या संवादानंतर त्या वयोवृद्धांच्या व्हॉईस कमांडद्वारे इसमे एचडी फोन देख सकते है क्या? असा प्रश्न विचारला. मोबाईलमध्ये व्हॉईस कमांड बंद असल्याचे त्याचा प्रश्न सर्च झाला नाही. यामुळे त्या वयोवृद्धाने त्या तरुणीच्या हातून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईल तरुणीच्या हातातच होता. तरी देखील त्या वयोवृद्धाने त्यावर HD PORN असं लिहून सर्च करायचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहिल्याने ती तरूणी घाबरली होती. दरम्यान, एका क्षणाचाही विलंब न लावता तिथून तातडीने निघून तो म्हातारा निघून गेली. हा म्हातारा ५५ ते ६० वयोगटातला असावा असा अंदाज तिने वर्तवला आहे.