शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

बस पकडताना पाय घसरला अन् डेपोत चाकाखाली आल्याने वृध्देचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 14:52 IST

Death :पाय घसरल्याने वृध्दा खाली पडली व त्याचवेळी बसचे चाक तिच्या डोक्यावरुन गेले, अशी माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे देवकाबाई नारायण सपकाळे (७०, रा.कानळदा, ता.जळगाव) या वृध्देचा मनमाड आगाराच्या मनमाड-भुसावळ बसच्या पुढील चाकाखाली आल्याने चिरडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता नवीन बसस्थानकात घडली.

जळगाव : कानळदा जाणारी बस लागल्याचा समज होऊन बस पकडण्यासाठी गेलेल्या देवकाबाई नारायण सपकाळे (७०, रा.कानळदा, ता.जळगाव) या वृध्देचा मनमाड आगाराच्या मनमाड-भुसावळ बसच्या पुढील चाकाखाली आल्याने चिरडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता नवीन बसस्थानकात घडली. पाय घसरल्याने वृध्दा खाली पडली व त्याचवेळी बसचे चाक तिच्या डोक्यावरुन गेले, अशी माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकाबाई नारायण सपकाळे, लिलाबाई व्यंकट सोनवणे (रा.लाडली, ता.धरणगाव) व सिंधूबाई मुरलीधर कोळी (रा.चिंचोली, ता.यावल) या तिघं बहिणी चाळीसगाव येथे लिलाबाई सोनवणे यांची नात जागृती युवराज कोळी हिच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होत्या. गुरुवारी हा कार्यक्रम झाल्यानंतर शुक्रवारी सकाळीच आपआपल्या गावाला जाण्यासाठी बसने जळगावात आल्या. सिंधूबाई यांची बस लागल्याने लिलाबाई या त्यांना बसपर्यंत सोडण्यासाठी गेल्या, जातांना मोठी बहिण देवकाबाई यांना जागेवरच थांबायला सांगितले होते. सिंधूबाई यांना सोडून परत आल्यावर देवकाबाई जागेवर नव्हत्या, कुठे गेल्या म्हणून शोध घेत असतानाच मनमाड-जळगाव बसच्या मागे एक महिला पडलेली दिसली, पातळवरुन ही बहिणच असल्याची खात्री झाल्यावर जवळ जावून पाहिले असता बहिणच होती व डोक्यातून मेंदू बाहेर आलेला होता. हा प्रकार पाहून लिलाबाई यांनी एकच आक्रोश केला.

 

टॅग्स :Deathमृत्यूBus DriverबसचालकJalgaonजळगावNashikनाशिकAccidentअपघातPoliceपोलिस