शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

चलनातून बाद झालेल्या २५ लाख ८० हजारांच्या नोटा पकडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 4:53 PM

नोटांसह तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने कटकटगेट परिसरात पाठलाग करून पकडले

ठळक मुद्देटक्केवारीवर नोटा विकणारे तिघे ताब्यात आरोपी पकडताना गुन्हे शाखेचे अधिकारी जखमी

औरंगाबाद : चलनातून बाद ठरलेल्या २५ लाख ८० हजारांच्या नोटांसह तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने कटकटगेट परिसरात पाठलाग करून पकडल्याची थरारक घटना सोमवारी सायंकाळी घडली. मंगळवारी दुपारी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

शेख उमर शेख गुलामनबी (३७, रा. रेणुकामाता मंदिराशेजारी, जाधववाडी), शेख मोईन शेख मुनीर (३५, रा. कांचनवाडी, जामा मशिदीच्या बाजूला), सय्यद अझरुद्दीन सय्यद अहेमद (३७, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) असे छापा टाकून पकडलेल्या तिघांचे नाव आहे. चलनातून बाद ठरलेल्या नोटा विक्री करण्यासाठी तिघे जण ग्राहक शोधत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे यांच्या पथकाने सापळा रचून कटकटगेट परिसरात पाळत ठेवली. संशयित रिक्षा (एमएच-२० बीटी-९७६०) कटकटगेटकडे येताना दिसली. त्यात तिघे जण बसलेले होते. खबऱ्यानुसार पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा करताच आरोपी नोटा घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. वावळे यांच्यासह पथकाने पाठलाग करून आरोपींना पकडले. त्यांची झडती घेतली असता हजार आणि पाचशेच्या नोटा आढळून आल्या. तिन्ही आरोपींनी या नोटा कुठून आणल्या, कुणाला विकणार होते? याविषयीचे कोडे सुटलेले नाही. अधिकारी जखमीशेख उमर हा रिक्षाचालक गाठोडे घेऊन पळू लागला, त्याचा पाठलाग करताना उडी मारून पकडण्याचा प्रयत्न करताना शेख उमर आणि सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे हे दोघेही खाली पडले. त्यामुळे वावळे यांच्या हातात रस्त्यावरील दगड लागून उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तरीदेखील उमरला नोटांसह ताब्यात घेतले. हातावरील जखमीला तीन ते चार टाके पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरीजप्त केलेल्या नोटांमध्ये १००० रुपयांच्या ९८० नोटा, ५०० रुपयांच्या ३२०० नोटा अशा, एकूण २५ लाख ८० हजार रुपयांच्या या बाद झालेल्या नोटा आहेत. विक्री करणारे रॅकेट पकडण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त मीना मकवाना,               सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, सहायक फौजदार शेख नजीर, रामदास गायकवाड, पोहेका. सतीश जाधव, चंद्रकांत गवळी, पोलीस नाईक सुधाकर राठोड, सुधाकर मिसाळ, रवींद्र खरात, आनंद वाहूळ आदींनी ही कारवाई केली आहे. 

दोन रिक्षाचालक :  शेख उमर शेख गुलामनबी, सय्यद अझरुद्दीन सय्यद अहेमद हे दोघे रिक्षाचालक असून, यांच्याकडे बाद नोटा आल्या कुठून, त्यांना कुणी दिल्या आहेत. या मागचे रॅकेट नेमके कोण, अशा विविध प्रश्नांचे उत्तर पोलिसांना मिळालेले नाही. या बाद नोटांच्या मूल्यांच्या २५ टक्के दलाली घेऊन त्यांची नोटा विकण्याची तयारी सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

एक आरोपी प्लॉट विक्रेता : शेख मोईन शेख मुनीर याचा कांचनवाडी परिसरात प्लॉट विक्रीचा व्यवसाय आहे. ही रक्कम प्लॉटिंगमध्ये आली की, कुणाकडून ती बदलून देण्याची प्रक्रिया राबविली जात होती. किती दिवसांपासून हा उपक्रम सुरू आहे. यापूर्वी हेराफेरीचे गुन्हे दाखल आहेत काय, इत्यादी प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादMONEYपैसाPoliceपोलिस