शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

काटोल वन विभागातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:01 IST

वन विभागातील काटोल वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील राऊंड ऑफिसर शरद रामराव सरोदे (५७) यांना ३६५० रुपयाची लाच स्वीकारताना अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वन विभागातील काटोल वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील राऊंड ऑफिसर शरद रामराव सरोदे (५७) यांना ३६५० रुपयाची लाच स्वीकारताना अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे वन विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.तक्रारदार हे भाटपुरा काटोल येथील रहिवासी आहेत. ते खासगी कॉन्ट्रॅक्टर आहेत. तक्रारदाराने गेल्या महिन्यात ३ डिसेंबर २०१९ रोजी मौजा बाभुळखेडा ता. काटोल जि. नागपूर येथील शेतामध्ये असलेल्या सागवानाची झाडे तोडण्याचा करार शेतमालकाकडून १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर केला. तसेच ही झाडे कापण्याची परवानगी मिळावी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडे विनंती अर्ज सादर केला. या अर्जासंदर्भात मोका पंचनामा करण्याकरिता राऊंड ऑफिसर शरद सरोदे यांनी तक्रारदारास ३६५० रुपयाची लाच मागितली. परंतु तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यांनी याबाबत नागपुरातील एसीबी अधिकाऱ्याकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक संजीवनी थोरात यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची गोपनीयरीत्या शहानिशा केली. त्यानंतर बुधवारी लाचखोर अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. ठरल्यानुसार तक्रारकर्त्याने लाच देण्याची तयारी दर्शविली. सरोदे याने काटोल वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर असलेल्या चहाच्या टपरीवर लाचेची रक्कम स्वीकारली. रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. सरोदेविरुद्ध काटोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर व अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात संजीवनी थोरात, योगिता चाफले, रविकांत डहाट, मंगेश कळंबे, रेखा यादव, राजेश बंसोड यांनी केली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणforest departmentवनविभाग