सिटीस स्कॅन करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत केले अश्लील चाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 21:38 IST2019-12-24T21:36:22+5:302019-12-24T21:38:49+5:30

न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कस्टडी दिली आहे.

Obscene tricks with a woman who went to the city scan | सिटीस स्कॅन करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत केले अश्लील चाळे

सिटीस स्कॅन करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत केले अश्लील चाळे

ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-5 येथील प्रसिद्ध रुग्णालयात सकाळी सिटीस स्कॅन करण्यसाठी 35 वर्षीय महिला गेली. अधिक तपास हिललाईन पोलीस करीत आहेत. हिललाईन पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरुन अत्याचाराचा गुन्हा दाखल करून जिम थॉमस याच्यावर गुन्हा दाखल केला.

उल्हासनगर - शहरातील एका प्रसिद्ध रुग्णालयात सिटीस स्कॅनसाठी गेलेल्या महिलेवर तेथील कर्मचाऱ्यांने अत्याचार झाला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक केली. न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कस्टडी दिली आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-5 येथील प्रसिद्ध रुग्णालयात सकाळी सिटीस स्कॅन करण्यसाठी 35 वर्षीय महिला गेली.  सिटीकॅन खोलीत महिलेला घेउन गेल्यावर तेथे तंत्रज्ञ असलेल्या जिम थॉमस याने सिटीस स्कॅन मशीनवर ठेवलेल्या महिलेसोबत अश्लील चाळे करून अत्याचार केला. याप्रकाराने घाबरलेल्या महिलेने हिललाईन पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार कथन केला. हिललाईन पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरुन अत्याचाराचा गुन्हा दाखल करून जिम थॉमस याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी दिली. अधिक तपास हिललाईन पोलीस करीत आहेत. 

Web Title: Obscene tricks with a woman who went to the city scan