शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

शरद पवार, रोहित पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणं भोवलं, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 16:54 IST

BJP Yuva Morcha state secretary detained : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रदीपच्या केसाला जरी धक्का लागला तर जबाबदारी आपली असेल, असे ट्वीट भाजपा आमदार राम सातपुते यांनी केले आहे.

पुणे : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांना मुंबईपोलिसांनी आज सकाळी पुण्यातील त्यांच्या घरून ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वांद्रे येथील तालुका अध्यक्ष असलेले सागर जावळे हे  राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष धुवाळी यांच्यासोबत काम करत असून धुवाळी यांनी दिलेल्या माहितीवरून जावळे यांनी तक्रार देऊन मुंबईपोलिसांकडे प्रदीप गावडे यांच्याविरोधात जबाब दाखल केला आहे. मुस्लिम समाज, शरद पवार आणि रोहित पवार यांच्याविरोधात प्रदिप गावडे यांनी ट्विटर हँडलवर केलेल्या आक्षेपार्ह ट्विटबाबत १३ मेला जबाब जावळे यांनी दाखल केला. त्यावरूनच चौकशीसाठी गावडे यांना पुण्याहून मुंबईत चौकशीसाठी आणले आहे. मात्र, कोणताही एफआयआर किंवा ४१ अ ची नोटीस दिली असता असे चौकशीसाठी घेऊन जाणे बेकायदेशीर असल्याचं गावडे यांचे वकील संकेत देशपांडे लोकमतशी बोलताना म्हणाले. 

मात्र प्रदीप गावडे यांना आज मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने अटक केली. पुण्याहून त्यांना मुंबई पोलीस मुंबईत घेऊन आले. मुंबई पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातच खेळणं झाल आहे.सरकारवर टीका करण गुन्हा असेल तर तो आम्ही हजार वेळेस करू. प्रदीपच्या केसाला जरी धक्का लागला तर जबाबदारी आपली असेल, असे ट्वीट भाजपा आमदार राम सातपुते यांनी केले आहे. भाजप युवा मोर्चा  प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले की, पंढरपूर निवडणुकीदरम्यान रोहीत पवारांच्या प्रचारासंदर्भात काही ट्वीट केले होते. त्याविरोधात पुणे आणि मुंबईत गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर त्याला एफआयआरची कॅापी न देता बीकेसी सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांत अटक करता येत नाही, असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असुनही अटक झाली आहे. 

भाजप युथ विंगचे राज्य सचिव अॅड. प्रदीप गावडे यांनी १० मेला पुणे सायबर पोलीसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी पोलीसांनी राष्ट्रवादी युथ विंगचे दोन कार्यकर्ते मोहसिन शेख आणि शिवाजीराव जवीर यांना अटक केली होती. बाजपेयी यांनी केलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली होती. या दोघांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोंशी छेडखानी करुन सोशल मिडियावर पोस्ट केले होते. आता गावडे यांनी पंतप्रधान मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची पत्नी अमृता फडणवीस, केंद्रिय मंत्री स्मृती इराणी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबाबत ५४ जणांविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली होती.त्याआधी ४ मेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही राजकीय नेते यांच्याविषयी अपमानास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट आणि मॅसेजेस् फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर पसरवल्याप्रकरणी १३ जणांविरोधात पहिल्यांदा प्राथमिक तक्रार दाखल झाली होती.

टॅग्स :PoliceपोलिसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMumbaiमुंबईTwitterट्विटरPuneपुणे