पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:55 IST2025-11-20T18:55:00+5:302025-11-20T18:55:41+5:30
पती सतत दारू पिऊन यायचा, तिला मारहाण करून त्रास द्यायचा. त्याने तिचे सर्व दागिने विकून टाकले. यानंतर त्याने एक दिवस आपले मित्र घरी बोलावले अन्....

पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून एक अत्यंत धक्कादायक आणि लज्जास्पद घटना समोर आली आहे. वझीरगंज परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने आपल्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पतीने तिला गुंगीचे औषध घालून कोल्ड्रिंक पाजून, घरी आपल्या मित्रांकडून शारीरिक शोषण करवून घेतल्याचा दावा तिने केला आहे. विरोध केल्यावर मारहाण करणे, छळ करणे आणि गुपचूप घर विकून फरार होणे यांसारख्या अनेक क्रूर कृत्यांचा समावेश यात आहे.
पीडित महिलेने पोलीस अधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली आहे. वझीरगंजचे इन्स्पेक्टर राजेश कुमार त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला याच परिसराची रहिवासी आहे. तिने आपल्या तक्रारीत सांगितले आहे की, १४ ऑक्टोबर २०२२ रोजी तिचा निकाह हरदोई रोडवरील अंधे की चौकीजवळ राहणाऱ्या एका व्यापाऱ्याशी झाला होता.
दारू, अय्याशी आणि घृणास्पद कृत्य
लग्नानंतर तिचा पती सतत दारू पिऊन यायचा, तिला मारहाण करून त्रास द्यायचा. त्याने तिचे सर्व दागिने विकून टाकले. यानंतर त्याने एक दिवस आपले मित्र घरी बोलावले. पीडितेच्या आरोपानुसार, एका दिवशी पतीने तिला फसवून गुंगीचे औषध मिसळलेले कोल्ड्रिंक पाजले. ती पूर्णपणे बेशुद्ध झाल्यावर पतीने आपल्या मित्रांकडून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
गर्भपात, मारहाण आणि फरार
या घृणास्पद कृत्याची माहिती झाल्यावर तिने विरोध केला, तेव्हा पतीने तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर तो वारंवार तिला मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागला. ती गर्भवती झाल्यावर पतीने जबरदस्तीने तिचा गर्भपात करवला. पतीच्या या सततच्या छळाला कंटाळून ती एका आजारपणात कशीबशी माहेरी पळून गेली. या संधीचा फायदा घेऊन पतीने गुपचूप त्यांचे घर विकले आणि तो स्वतः फरार झाला.
अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
काही दिवसांनी जेव्हा पीडितेला पळून गेल्याची माहिती मिळाली, तेव्हा तिने त्याला फोन केला. त्यावेळी पतीने तिला तक्रार केल्यास गंभीर परिणामांची धमकी दिली. नंतर पतीने तिला भाड्याच्या घरात एकत्र राहण्याचा दबाव टाकला. तिने याला विरोध करताच, त्याने तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.
पतीच्या धमक्या आणि सततच्या छळाला कंटाळून पीडितेने थेट पोलीस अधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे लेखी तक्रार केली. यानंतर वझीरगंज पोलीस ठाण्यात तिचा पती आणि त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इन्स्पेक्टरने सांगितले की, तक्रारीच्या आधारावर आरोपी पती आणि त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, आरोपींना लवकरच अटक केली जाईल.