ठळक मुद्देओशिवरा पोलिसांनी देखील नाना पाटेकर यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती दिली आहे.अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही महिन्यांपूर्वी Me Too मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता.
मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून अभिनेते नाना पाटेकर यांना अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने दाखल केलेली तक्रार म्हणजेच Me Too प्रकरणी क्लीन चीट मिळाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, नाना पाटेकर यांना याप्रकरणी अद्यापही क्लीन चीट मिळालेली नाही, असा खुलासा बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता यांचे वकील नितीन सातपुते यांनी केला आहे. यासंदर्भात ओशिवरा पोलिसांनी देखील नाना पाटेकर यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती दिली आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही महिन्यांपूर्वी Me Too मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मोठा गदारोळ झाला होता. या गाण्यातील एका दृश्यावर तनुश्रीने आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिने या चित्रपटातून माघार देखील घेतली होती. त्यानंतर ती परदेशात वास्तव्यास गेली होती. गेल्या वर्षी ती परदेशातून भारतात आली. त्यानंतर तीने Me Too मोहिमेअंतर्गत नाना पाटेकरांविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. या आरोपाची दखल घेऊन ओशिवरा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन दिवसांपासून याप्रकरणी नाना पाटेकर यांना क्लीन चीट मिळाल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर सुरु होती. यावर तनुश्री दत्ताने एक स्टेटमेण्ट जारी केली आहे. तसेच तिचे वकील नितीन सातपुते यांनी खुलासा करत व्हायरल झालेली माहिती खोटी असल्याचा दावा केला आहे. तनुश्रीच्या स्टेटमेण्टमध्ये तिने म्हटले आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून नाना पाटेकर यांना क्लीन चीट दिल्याची बातमी फिरत आहे. परंतु, यासंदर्भात मुंबई पोलिसांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. Me Too चळवळीनंतर नाना पाटेकर यांना कोणतेही काम मिळत नसल्याने त्यांची टीम अशाप्रकारच्या खोट्या बातम्या पसरवत आहे.
Web Title: Not given clean chit yet to Nana patekar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.